कंधार ; प्रतिनिधी
वेरूळ येथिल बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक असणारे श्री घृष्णेश्वर , दौलताबाद येथे भद्रामारुतीचे व शनिदेवला साकडे घालून फुलवळ सर्कल मधील शेतकरी व नागरीकाच्या कल्याणासाठी तसेच मराठवाड्यात पाऊस पडावा म्हणून फुलवळचे माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांनी साकडे घातले .
ईश्वरचरणी प्रार्थना करताना माजी सरपंच देवकांबळे बालाजी भुजंगा ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच
फुलवळ ,गुंटूरचे माजी सरपंच बाबुराव पाटील शिंदे मुख्याध्यापकश्री संत निवृत्ती महाराज विद्यालय भवानीनगर कंधार , बाबुराव राठोड माजी मुख्याध्यापक उमरी , अंबादास पाटील मोरे राहणार पानशेवडी ,कैलास सोमासे राहणार फुलवळ या सर्वांची यावेळी उपस्थिती होती.