कंधार ; प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, नगर परिषद कंधार तर्फे राजा राममोहन राय फाउंडेशन, कलकत्ता यांच्या सूचनेनुसार स्वातंत्र्य भारताच्या ७५ वे महोत्सवी वर्ष (आजादी का अमृत महोत्सव) म्हणून साजरे केले जात आहे.स्वातंत्र्य चळवळी वरील मराठी, हिंदी, उर्दू, मधील निवडक ग्रंथाचे प्रदर्शन दिनांक ०९ ते १५ ऑगस्ट २०२१ असे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती स.ग्रंथपाल मोहम्मद रफीक सतार यांनी सोमवार दि.9 अॉगस्ट रोजी दिली.
सदरील ग्रंथ प्रदर्शन मुख्याधिकारी श्री विजय चव्हाण , नगराध्यक्षा सौ. शोभाताई अरविंदरावजी नळगे, उपाध्यक्ष म.जफरोद्दीन, व सर्व सन्माननीय सदस्य न.प. यांच्या मार्गदर्शनाखाली वाचनालयातर्फे स्वातंत्र्य चळवळी वरील मराठी, हिंदी, उर्दू, मधील निवडक ग्रंथाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
दिनांक ०९ ते १५ ऑगस्ट २०२१ असे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून दि.९ रोजी ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली.
मोहम्मद रफीक सत्तार यांनी डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या जीवन कार्यावर माहिती दिली. वाचनालयाचे सभासद मुख्याध्यापक दिगंबर वाघमारे , संपादक हिंदी बाणा भालेराव माधव, संतज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल चे प्राचार्य चिलपिपरे मारोती , घाटे सर यांच्यासह मोठ्या संख्येत वाचक, अभ्यासक, सभासद उपस्थित होते.
यावेळी ग्रंथालय कर्मचारी मिलिंद महाराज, लता ढवळे, किसन भालेराव, राधाबाई जवादवाड, यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. ग्रंथ प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मोहम्मद रफीक सतार स. ग्रंथपाल न.प.वा. कंधार यांनी केले आहे.