कंधार नगर परिषदे अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलनाला महात्मा ज्योतीबा फुले यांचे नाव देण्यात यावे – संयुक्त ग्रुप कंधार ची मागणी

कंधार ; प्रतिनिधी

राष्ट्रकुटाची राजधानी असलेल्या कंधार
शहराला ऐतिहासीक वारसा लाभलेला आहे.आणि तोच वारसा पुढे कायम ठेवण्यासाठी महापुरुषांचे विचार कंधार शहरातील जणमानसांच्या मनात रूजवले पाहिजे.त्यासाठीचे एक पाऊल म्हणजे कंधार शहराच्या मध्यभागी कंधार न.परिषदे अंतर्गत बनवण्यात येत असलेल्या व्यापारी संकुलनाला महात्मा ज्योतीबा फुले यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी नगरपालीकेच्या मुख्याधिकारी विजय चव्हाण यांच्याकडे संयुक्त ग्रुप कंधार शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.

कंधार नगर परिषदेच्या इमारतीस महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिलेले आहे.आणि बाबासाहेबांचे गुरु असलेले महात्मा ज्योतीबा फुले यांचे व्यापारी संकुलणाला नाव देऊन गुरू-शिष्याचा एक आदर्श जणते समोर कंधार नगर परिषदेने ठेवावा.


स्वातंत्र,समता,बंधूता,मानवी प्रतिष्ठा,सामाजीक व आर्थीक न्याय,शोषण विरहीत समाजरचना,समान संधी अशा महान नैतिक मुल्यांनवर अधारित समाजरचनेचे स्वप्न ज्या महापुरुषाने पाहिले ते अधुनिक भारताचे पहिले थोर समाज क्रांतीकारक ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला अशा महात्मा ज्योतीबा फुले यांचा कंधार शहरात एकपण पुतळा नाही व कोणत्याही सार्वजणीक ठिकाणाला महात्मा फुले यांचे नाव देण्यात पण आलेले नाही.

म्हणून मा.मुख्याधिकारी साहेबांनी नगर परिषदे अंतर्गत बनवण्यात येत असलेल्या व्यापारी
संकुलणाला महात्मा ज्योतीबा फुले यांचे नाव द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

यानिवेदनावर
साईनाथ भगवानराव मळगे संस्थापक अध्यक्ष संयुक्त ग्रुप महाराष्ट्र राज्य,विजेंद्र मिलिंदराव कांबळे
संयुक्त ग्रुप कंधार – तालुका अध्यक्ष,बालाजी चुकुलवाड जिल्हा अध्यक्ष माजी सैनिक संघटना नांदेड,नामदेव डुबुकवाड शहर प्रसिद्धीप्रमुख, तिरुपती इंगळे संयुक्त तक्रार निवारण अभियान अध्यक्ष, शिव इंगळे उपाध्यक्ष, मोनित गायकवाड,सुरज बसवंते,विजय वाघमारे,

रत्नदीप वाघमारे, राहुल लोहकरे सामाजिक कार्यकर्ता, जगन्नाथ घोडजकर, केदारनाथ देवकांबळे, गजानन बोईनवाड, संतोष गायकवाड आदीच्या स्वाक्षरी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *