कंधार दि 9 ऑगस्ट (प्रतिनिधी)
संजय शिक्षण संस्था कंधार चे उपाध्यक्ष युवा नेते कृष्णाभाऊ भोसीकर यांच्या वाढदिवसानिमित्त दि 9 ऑगस्ट रोजी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सामाजिक उपक्रमांतर्गत दैठणा तालुका कंधार येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले व यावेळी वृक्षारोपण करण्यात आले .
यावेळी,नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर,सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर,कॉग्रेसचे जेष्ठ नेते लालबा पाटील शिंदे,सरपंच नामदेव चोंडे, बहाद्दरपुरा येथिल उपसरपंच हणमंतराव पाटील पेटकर,माधवराव सुगावकर,किशन महाराज चोंडे,शालेय समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाटील आनकाडे, चेअरमन पांडु पाटील देठणेकर, तानाजी जाधव, हरी पाटील, मधुकर पाटील लुंगारे,वसंत पाटील जाधव, गणपतराव सोनकांबळे, खाजा शेख, विठ्ठलराव पवार, सुधाकर मोरे, भुजंग आंकलगे, भगवान पाटील, तुकाराम चोंडे, श्रीराम पाटील, उध्दव आनवाडे, मल्हारी वाघमारे, मुख्याध्यापक श्रीमंगले सर, सुदर्शन पेटकर, मन्मथ मेळगावे, संभाजी नांदेडे आदीसह गावकरी नागरिक उपस्थिती होती.
भोसीकर कुटुंबातील सर्व सदस्य आपले वाढदिवस लग्नाचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमातून साजरी करत असतात. आजपर्यंत भोसीकर घराण्याची परंपरा राहिली आहे .
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हे सर्व उपक्रम भोसीकर कुटुंबीय व कंधार लोहा तालुक्यात लाभ होत असतात याच उपक्रमाचा एक भाग म्हणून माजी आमदार ईश्वराव भोसीकर यांचे नातू व संजय भोसीकर यांचे चिरंजीव कृष्णा भाऊ यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त दैठणा येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खाऊ वाटप केले व गावात वृक्षारोपण केले .
यावेळी दैठणा ग्रामपंचायत व गावातील नागरिकांच्या वतीने कृष्ण भाऊ यांचा सत्कार करून त्यांचे अभिष्टचिंतन केले व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल कृष्णा भाऊ यांनी सर्व गावकऱ्यांचे आभार मानले.
याप्रसंगी सौ वर्षाताई भोसीकर यांनी शाळेतील शिक्षकांना कोरोणामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन त्यांना शिकवावे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले
व गावातील सर्व नागरिकांनी कोरोणाच्या बाबतीत गावातील नागरिकांनी शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपले व आपल्या कुटुंबियांचे रक्षण करावे असे आवाहन केले.
तर याप्रसंगी बोलताना संजय भोसीकर म्हणाले की दैठणा नगरी हे माझे गावापासून येथील सर्व नागरिकांनी आज पर्यंत आम्हाला भरपूर आशीर्वाद व प्रेम दिले आहे. या प्रेमाच्या विसर कधीही पडणारा नसून भविष्यामध्ये देखील पैठण येथील विकास कामाबाबत व गावातील नागरिकांच्या सुखा दुखा मध्ये सदैव सहभागी आहे असे संजय भोसीकर यांनी अभिवचन दिले .
दैठण्याच्या विकासाबाबत येणाऱ्या भविष्यकाळात सर्व प्रश्नांची निश्चितच सोडवणूक केली जाईल असेही संजय भोसीकर म्हणाले.
यावेळी गावातील नागरिकांची व शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.