कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यात एकच महाविद्यालय असल्याने उस्मानगर शिराढोण या भागातील अनेक विद्यार्थ्यांची हेळसांड होत होती. बारावी पास झालेले अनेक विद्यार्थी महाविद्यालय दुर असल्याने पुढील शिक्षणापासुन वंचित राहीले आहेत.
या सर्व बाबीचा विचार करुन शिवा संघटनेचे संस्थापक प्रा.मनोहर धोंडे यांनी उस्मानगर येथे महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाची मान्यता मिळविली असुन आज या महाविद्यालयाचा उदघाटन सोहळा दि.९ रोजी संपन्न झाला आहे.या महाविद्यालयामुळे अनेक विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याची माहीती प्रा.मनोहर धोंडे यांनी दिली आहे.
उस्माननगर शिराढोण या भागातील विद्यार्थ्यांना बारावी नतंर पुढील शिक्षण घेण्यासाठी कंधार किंव्हा नांदेड येथेच जावे लागत होते.जवळपास महाविद्यालय नसल्याने ग्रामीणा भागातील अनेक मुलींनी शिक्षण घेणे बंद केले आहे.या भागात महाविद्यालय यावे अशी अनेक पालकांची इच्छा होती.
या संदर्भात पालकांनी प्रा.मनोहर धोंडे यांच्याकडे इच्छा प्रगट करुन दाखवली होती.प्रा.मनोहर धोंडे यांनी हा विषय घेऊन पाठापुराव केला या पाठपुराव्याला यश अले असुन महात्मा बसवेश्वर महाविद्यालय यास मान्यता मिळाली आसुन आज या विद्यालयाचे उदघाटन सोहळा संपन्न झाला.
या उदघाटन सोहळा कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रा.मनोहर धोंडे हे होते तर प्रमुख पाहुन म्हणून जिल्हा नियोजन समिती चे सदस्य एकनाथ मोरे, महंत आवधुत बन महाराज,सभापती लक्ष्मीबाई घोरबांड,चंद्रकांत लाठकर महारज,रामचंद्र येईलवाड, बाबूराव मोरे,वैजनाथ तोनसुरे,यासह आनेक मान्यवर उपस्थीत होते.मान्यवरांच्या हस्ते रिबिन कापुन महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे उदघाटन करण्यत आले .
या गावात मी ज्ञान मंदिर उभारले आहे बाकी जबाबदारी ही गावकऱ्यांची आहे .भविष्यात या काॕलेजला गुणवंतेच्या बाबतीत नामांकीत काँलेज बनवणार असल्याची घोषणा प्रा.मनोहर धोंडे यांनी आपल्या भाषणातुन केली आहे. यावेळी शेवडी चे सरपंच बसवेश्वर धोंडे, माजी सरपंच कैलास धोंडे, संदीप पाटील घोरबांड, प्रल्हाद पाटील घोरबांड, गणेश घोडके, साधू पाटील वडजे व गावातील नागरिक व ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.