अर्धापुर ; प्रतिनिधी
श्री सूर्यकांत सावरगावे सहाय्यक अभियंता अर्धापूर उपविभाग यांचा त्यांच्या 28 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवापुर्ती निरोप समारंभ एकलव्य इंटरनॅशनल स्कूल दाभड येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री एम एम गोपूलवाड अधीक्षक अभियंता नांदेड मंडळ कार्यालय हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून हंचाटे मॅडम ,अतिरिक्त कार्यकारी अभियंता नांदेड ग्रामीण विभाग यांची होती. प्रमुख मान्यवर म्हणून श्री बबनराव बारसे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य नांदेड, श्री पटेल साहेब कार्यकारी अभियंता नांदेड मंडळ, श्री संजय कोठाळे सर ,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मराठवाडा प्रमुख तथा नांदेड जिल्हा सहकारी शिक्षक पतसंस्था संचालक,
श्री भुसारी साहेब अतिरिक्त कार्यकारी अभियंता नांदेड शहर, तसेच सहायक अभियंता पंकज देशमुख साहेब मुदखेड, धकाते साहेब , पाटील साहेब, बुकावार साहेब ,धाकडे साहेब व अर्धपुर उपविभागातील सर्व शाखेचे तांत्रिक कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
आयोजकांच्या वतीने श्री सूर्यकांत सावरगावे यांना आहेर व भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करून निरोप देण्यात आला .यावेळी गोपुलवाड साहेब यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना सावरगावे साहेब हे एक निर्भीड व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून वीज मंडळाच्या अतिशय कठीण काळात देखील त्यांनी प्रामाणिक सेवा केली व त्यांची कमतरता आम्हाला नेहमी भासत राहील असे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाचे आयोजन श्री कादरी साहेब उपकार्यकारी अभियंता अर्धापूर विभाग व त्यांचे सहकारी श्री खिल्लारे ,श्री कानुले ,श्री इंगोले, श्री कुलकर्णी ,पेदे मॅडम ,कोकाटे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ कोळीगीरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कैलास हांपल्ले यांनी केले.