सोशल मिडीया फेसबुक माध्यमांतुन पत्रकार व राजकीय व्यक्ती विरोधात आक्षपार्ह मजकुर टाकणा-यावर कायदेशीर कार्यवाही करा – कंधार भाजपाचे पोलीसांना निवेदन

कंधार ; प्रतिनिधी
समाज माध्यमातून फेसबुक वरून पत्रकार बांधव यांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा म्हणून आज शनिवार दि.१४ आॉगस्ट रोजी पोलिस निरीक्षक झुंजारे यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन देऊन मागणी केली,

फेसबुक सोशल मिडीयावर सुमित कन्नावार दि.१३ अॉगस्ट रोजी पत्रकार व भाजपा राजकीय पुढाऱ्यांवर आक्षेपार्ह लेखन केले होते. सदरील कृत्य करणाऱ्यांस तात्काळ कार्यवाही करा असे निवेदन दिले यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड ,शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार,निलेश गौर,मधुकर डांगे,ॲड.सागर डोंगरजकर आदीच्या स्वाक्षरी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *