कंधार येथिल तहसील कार्यालय परिसरात रानभाजी महोत्सव संपन्न ;शेतकऱ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याचे तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांची माहीती.

कंधार ; प्रतिनिधी

दिनांक १३ ऑगस्ट २०२१ रोजी तहसील कार्यालय परिसरात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होते या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.तहसिलदार कंधार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक , श्रीमती एम आर सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी नांदेड रविकुमार सुखदेव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.

तालुका कृषी अधिकारी, कंधार रमेश देशमुख,मंडळ कृषी अधिकारी,पेठवडज विकास नारळीकर, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, विनोद पुलकुंडवार,मंडळ अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी छायाचित्रकार, पत्रकार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी तालुक्यातून विविध बचत गटांचे शेतकरी बांधवांचे भाजीपाला, सुयोग इंडस्ट्री संगुचीवाडी ता.कंधार यांचे विविध वजनाचे लाकडी घाण्यावरील तेल,मिरची पावडर, हळद पावडर,धने पावडर अशी विविध प्रकारची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होती.


याप्रसंगी शेतकरी व कर्मवीर भाऊराव पाटील शेतकरी गटाचे पांडुरंग व्‍यंकटराव कंधारे रा. पेठवडज , संगुचिवाडी ता. कंधार येथील बळीराम गंगाराम मुंजे, पानशेवडी येथील अनिल बाबुराव मोरे, ब्रह्माजी संभाजी मोरे,यशोदीप चिली पावडर इंडस्ट्रीचे श्री विठ्ठल नारायण वारकड, सुयोग फूड इंडस्ट्री संगुचिवाडी येथील चंद्रकांत, पेठवडज येथील बालाजी शिंदे ,ज्ञानेश्वर बाबुराव डावखरे आदी शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या.


या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या संकल्पनेतून विकेल ते पिकेल शेतकरी ते ग्राहक थेट विक्री अश्या रानभाजी महोत्सवाचे आयोजन मागील वर्षापासून सुरू असून अतिशय चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला उपलब्ध मिळाला. जिल्हा स्तरावरील यशस्वी योजना नंतर अशाच प्रकारचे महोत्सव संपूर्ण तालुक्यात आयोजन करण्याबाबत दिलेल्या सूचनेनुसार आज कंधार तालुक्यात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं


विक्रीसाठी उपलब्ध होत्या यामध्ये रानभाज्या ,करटुले ,वाघाटे,आघाडा ,अळू कुंजर ,कुरडू, डेवडांगर, नाय, केना, सुरकंद, मोठी घोळ, छोटी घोळ, अंबाडी, तरोटा,कडीपत्ता,चमकुरा,चुका ,शेपू या रानभाज्या उपलब्ध केलेल्या होत्या. ही उत्पादने विक्रीसाठी होती. या संपूर्ण उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची मागणी होती रानभाज्या महोत्सवातून शेतकऱ्यांना विक्रीसाठी नवे दालन उपलब्ध झाले असून विकेल ती पिकेल या राज्य शासनाच्या संकल्पनेतून हा अतिशय स्तुत्य उपक्रम यशस्वी झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *