गणपतराव मोरे विद्यालय कंधार चा विद्यार्थी बालाजी शिवाजीराव लाडेकर यांची लेफ्टनं कर्नल पदी निवडीबद्दल सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

घोडज येथील सामान्य कुटुंबात जन्म घेतलेले व भारतमातेची सेवा करण्याची जिद्द व स्वप्न उराशी बाळगून गणपतराव मोरे विद्यालयाचा विद्यार्थी बालाजी शिवाजीराव लाडेकर यांची लेफ्टनं कर्नल पदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार ईश्वर रावजी भोसीकर यांनी आज दि.१५ रोजी गणपतराव मोरे विद्यालय येथे नवनियुक्त सैनिकाचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

भावी आयुष्य देशसेवेसाठी व गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी जावो शुभेच्छा देण्यात आल्या.
या सत्कार समारंभास शाळेचे मुख्याध्यापक गोविंद कौसंले सर सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *