कंधार ; प्रतिनिधी
भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त लहुजी साळवे निराधार बालक आश्रम धनगरवाडी येथे धर्मभूषण ॲड. दिलीपभाऊ ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून
लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या वतीने विद्यार्थ्यांना गणवेश वाटप तसेच देशभक्ती गीतावर नृत्य व गायन स्पर्धा घेण्यात आली.
सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन लॉयन्स अध्यक्ष लॉ.दिलीप ठाकूर, सचिव लॉ. अरुणकुमार काबरा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कोषाध्यक्ष लॉ. सुरेश निल्लावार, सहसचिव लॉ.
सुरेश शर्मा, माजी अध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल, माजी सचिव लॉ.ॲड. उमेश मेगदे, कर सल्लागार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाबिशन कांकर,भाजपा मंडळ सरचिटणीस कामाजी सरोदे, भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा सरचिटणीस रुपेश व्यास यांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्थेचे सचिव लालबा घाटे यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, फळे व बिस्किट वितरित करण्यात आले. बालक आश्रमातील मुलांनी तसेच नर्सिंग कॉलेजच्या मुलींनी स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन एका पेक्षा एक नृत्य व गीते सादर करून सर्वांची मने जिंकली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. दिलीप ठाकूर उमेश मेगदे, गंगाबिशन कांकर यांची समयोचित भाषणे झाली.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा रेखा घाटे, दलित मित्र रामराव सुर्यवंशी, माजी सरपंच विशंभर फुले, बालाजी जामकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अजय देवकर तर आभार अनुराधा वर्मा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बेंद्रीकर सर, वाठोरे सर, कु. दिपाली बुक्तरे ,राहुल सूर्यवंशी, सौ.सविता कल्याणकर, राऊत मॅडम यांनी परिश्रम घेतले.
लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या वतीने दिव्यांग विद्यार्थिनीला तिच्या घरी जाऊन व्हील चेअर देतांना अध्यक्ष धर्मभूषण लॉ.ॲड.दिलीप ठाकूर, सचिन लॉ.अरुणकुमार काबरा,कोषाध्यक्ष लॉ.
सुरेश निल्लावार, प्रोजेक्ट चेअरमन लॉ.सुरेश शर्मा आदीची यावेळी उपस्थिती होती.