कंधार ; प्रतिनिधी
दि.15.08.2021 रोज रविवार श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बारुळ येथे 75 व्या स्वातंत्र्य दिना निमित्य व्दजारोहणाचा कार्यक्रम सकाळी ठिक 7: 20 वाजता विद्यालयाचे मुख्याध्यापक साहेब, श्री वट्टमवार ए. बी. यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.
ध्वजारोहनासाठी गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष, सोसायटीचे चेअरमन व ग्राम पंचायतचे सर्व सदस्यांसह सर्व प्रतीष्ठित नागरीक आणि प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व मोजकेज विद्यार्थी कोविड 19 चे सर्व नियम पाळून उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उच्च माध्यमिक विद्यालयातील क्रिडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. राहूल वाघमारे सरांच्या संकल्पनेतून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत, हैद्राबाद मुक्ती संग्राम लढयात योगदान देणारे श्री शिवाजी मोफत एज्यूकेशन सोसायटी ता.कंधारचे संस्थापक व संचालक माजी आमदार व खासदार, थोर स्वातंत्र्य सेनानी डॉ. भाई केशवरावजी धोंडगे साहेब, व माजी आमदार थोर स्वातंत्र्य सेनानी श्री शिवाजी मोफत एज्यूकेशन सोसायटी ता. कंधारचे सचिव भाई गुरुनाथरावजी कुरुडे साहेब यांच्या व्यक्ती चित्राचे रेखाटन (रांगोळीतून) करण्यात आले होते.
तसेच कला शिक्षक श्री मेहकरकर पी. जी. यांनी ऑलम्पीक वीर निरज चोप्रा यांचे चित्र स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छासह वार्ता फलकावर काढले होते. प्रा.अरुण कौसल्ये यांनी भाई केशवरावजी धोंडगे साहेबांच्या शतकजन्मोत्सवानिमित्य यांच्या कार्यावर प्रकाश टाकनारे मान पत्र तयार केले व श्री मेहेत्रे सरांनी वृक्ष लागवड करुन संवर्धन केल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. पुरुषोत्तमरावजी धोंडगे साहेबांनी विद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन प्रा. राहूल वाघमारे सर, प्रा. अरुण कौसल्ये सर, श्री मेहककर सर, श्री मेहेत्रे सर यांचे कौतुक करुन त्यांना प्रेरणा देणारे मुख्याध्यापक श्री वट्टमवार ए.बी., उप मुख्याध्यापक श्री बसवंते बी.एम., पर्यवेक्षक श्री कुंडगीर पी. आर., वरिष्ठ लिपीक श्री धोंडगे बी. बी. यांच्या सह सहकार्य करणा-या सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे अभिनंदन केले.