Post Views: 187
अहमदपूर ( प्रतिनिधी प्रा भगवान आमलापुरे. )
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या शतकोत्तर जयंती निमित्त अहमदपूर येथील समतावादी सांस्कृतिक साहित्य परिषदेच्या वतीने मंगळवारी,दि १७ आँगस्ट २१ रोजी सायंकाळी ०५ : ०० वाजता विद्रोही कविसंमेलनाचे आयोजन येथून जवळच असलेल्या मौजे मोघा येथे करण्यात आले आहे. या कविसंमेलनाचे अध्यक्ष विलास सिंदगीकर, सदस्य, साहित्य सां.मं.महाराष्ट्र ; तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ मारोती कसाब, उदगीर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कोवीड १९ प्रतिबंधक नियमांचे तंतोतंत पालन करून होणाऱ्या या कवी संमेलनात विलास सिंदगीकर, डॉ सुशिलप्रकाश चिमोरे, डॉ मारोती कसाब, डॉ व्यंकट सुर्यवंशी, प्रफुल्ल धामणगावकर, ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, अंकुश सिंदगीकर, सतिष नाईकवाडे, एन डी राठोड, चंद्रकांत मोरे, आणि माधव वाघमारे हे कवी सहभागी होणार आहेत. सदर कविसंमेलन मोघा येथील फकिरा निवास, भगवानराव नागरगोजे नगर येथे पार पडणार आहे.
या कविसंमेलनाचा लाभ मोघा आणि अहमदपूर परिसरातील रसीक श्रोत्यांनी घेण्याचे आवाहन संयोजक माजी प्राचार्य तुकाराम हरगीले, अध्यक्ष समतावादी सांस्कृतिक साहित्य परिषद, अहमदपूर यांनी केले आहे.