कंधार ; प्रतिनिधी
संत निरकांरी परीवार कंधार शाखेच्या वतीने आज रविवार दि.१५ आॉगस्ट रोजी ग्रामीण रुग्णालय परीसर स्वच्छ करुन वृक्षारोपन कार्यक्रम वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर व संगीता कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
संत निरकांरी परीवार कंधार
सेवादल इन्चार्ज संचालक कांतीलाल राठोड तसेच शिक्षक संजय राठोड यांनी नियोजन केले होते.तसेच परीवाराचे सेवादल शिक्षिका उज्वला सिध्दनाथ व सेवादल मेंबर सुनील , वसंत , आनंद , गोवर्धन ,गणेश चव्हाण , राजश्री जयभाये , संगीता राठोड , अनुसया , रत्नप्रभा आदीनी सेवा दिली.यावेळी ग्रामिण रुग्णालयातील सर्व डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.