फुलवळ येथे स्वातंत्र्य दिनी झेंडावंदन व सत्कार सोहळा संपन्न.

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

१५ ऑगस्ट अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनी फुलवळ ता. कंधार येथे ठिकठिकाणी ध्वजारोहण करून अभिवादन करण्यात आले आणि येथून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना निरोप व येथे नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा स्वागत सत्कार सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.

स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील जि.प. शाळेत मु.अ. बालाजी केंद्रे , श्री बसवेश्वर विद्यालयात मु.अ. बी. एन. मंगनाळे , ग्राम पंचायत कार्यालयात सरपंच सौ. विमलबाई नागनाथ मंगनाळे तर पशु वैद्यकीय दवाखाना येथे येथील कर्मचारी गुट्टे व बालाजी केंद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

झेंडावंदन चा कार्यक्रम संपताच येथीलच ग्राम पंचायत कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित सत्कार सोहळ्यात येथून नुकतीच बदली झालेले आरोग्य कर्मचारी सुधाकर पाटील मोरे आणि कृषी सहाय्यक गंगाधरराव खाडे यांच्या निरोप समारंभानिमित्त तर येथे नव्याने रुजू झालेल्या तलाठी श्रीदेवी उस्तुर्गे आणि कृषी सहाय्यक रोहिणी पवार / पवळे , आरोग्य उपकेंद्र येथील डॉ. मुश्ताख अहेमद यांचा स्वागत सोहळ्यानिमित्त येथील मराठी पत्रकार संघाच्या वतीने व ग्राम पंचायत च्या वतीने पुष्पगुच्छ , शाल देऊन गौरव करण्यात आला.

सरपंच सौ. विमलबाई मंगनाळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार विश्वांभर बसवंते यांनी केले तर प्रस्तावित पत्रकार धोंडीबा बोरगावे यांनी आभार ग्राम पंचायत सदस्य प्रवीण मंगनाळे यांनी व्यक्त केले.

यावेळी सत्कारमूर्ती सुधाकर पाटील मोरे , गंगाधरराव खाडे , रोहिणी पवार / पवळे आणि श्रीदेवी उस्तुर्गे यांनीही आपापले मनोगत व्यक्त केले , सत्कार व मनोगतानंतर अल्पोपहार नंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

यावेळी फुलवळ मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर डांगे , सचिव दिगंबर डांगे , पत्रकार मधुकर डांगे , होनाजी शेळगावे , उमर शेख , शादुल शेख सह सर्व पत्रकार तसेच सर्व ग्राम पंचायत  सदस्य , सर्व आरोग्य कर्मचारी , सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *