गुलाब -फुले ..तीन क्विंटल .. पुष्पहार ..लांबी. ४०फूट…अन सात तास ;
लोहा ; प्रतिनिधी
देशाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा पहिलाच दिवस ..मराठवाड्याचे लक्ष वेधून घेणार ठरला..जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या “होम पिच ” वर या यात्रेचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले..केंद्रीय मंत्री व मान्यवरांच्या स्वागता साठी तीन क्विंटल गुलाब व फुलांचा ४०फूट लांब हार होता..दोन जेसीबी च्या साहायाने हा हार घालण्यात आला..नांदेड जिल्ह्यात भव्यदिव्य झालेले स्वागत पक्ष कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारा ठरला.. या अभूतपूर्व स्वागताच्या पुष्पहाराची संकल्पना व नियोजन होते युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर .
मराठवाड्यात भाजपचे केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांच्या नेतृत्वात जन आशीर्वाद यात्रा गोपीनाथ गडा वरून सुरू झाली.नांदेड जिल्ह्यात यात्रेचे जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात अभूतपूर्व जंगी स्वागत करण्यात आले..
लोह्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्रीय मंत्री भागवत कराड जिल्ह्याचे खा चिखलीकर, आ.अतुल सावे, आ संतोष पाटील दानवे, प्रवीण घुगे, माजी मंत्री विनायकराव पाटील , अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आ सुधाकर भालेराव, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकार, महानगराध्यक्ष प्रवीण साले, , युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांचा ४०फूट लांब पुष्पहार घालून जंगी ..अभूतपूर्व स्वागत करण्यात आले..कदाचित मराठवाडयातील सर्वात आकर्षक स्वागत ठरणार आहे.
स्वागतासाठीचा गुलाब-शेवंती -झेंडू हैदराबाद -सोलापूर हुन मागविण्यात आले होते.तीन क्विंटल वजनाचा हा हार तयार करण्यासाठी तब्बल सात तास लागले .या पुष्पहाराची लांबी चाळीस फूट इतकी होती यासाठी शशील फुलारी, अहमदपूर यांनी हा हार तयार केला .शेख शरीफ, गणराज रोकडे, कृष्णा माळी यानी मदत केली.सकाळी सात वाजता सुरू झालेले पुष्पहाराचे काम तब्बल सात तासा नंतर दुपारी तीन वाजता संपले.. हा पुष्पहार ट्रॅक्टर मधून स्वागतस्थळी आणण्यात आला.दोन मोठ्या जेसीबीच्या साहायाने केंद्रीय अर्थराज्यमंत्री, जिल्ह्याचे खासदार व मान्यवरांना घालण्यात आला.प्रतापरावांच्या होम पीचवर नांदेड जिल्ह्यात जे अभूतपूर्व स्वागत जन आशीर्वाद यात्रेचे झाले ते भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात नवचैतन्य निर्माण करणारे ठरले.युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर हे राजकीय मॅनेजमेंट गुरू म्हणून ओळखले जातात.माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जनादेश यात्रेचे भव्य पुष्पहाराने जंगी स्वागत करण्यात आले होते. तसेच त्या पेक्षाही सरस आणि भव्य असे स्वागताचे नियोजन कमी कालावधीत प्रवीण पाटील चिखलीकर यांनी केले .यावेळी लोहा नगर पालिकेचे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, उपनगराध्यक्ष शरद पवार, माणिकराव मुकादम, छत्रपती धुतमल, केशवराव मुकादम यांच्यासह नगरसेवक,पंचायत समितीचे सभापती ढाकणीकर, मार्केटचे सभापती बालाजी पाटील मारतळेकर, भाजपाचे नेते दिलीप कंदकूर्ते, लक्ष्मणराव ठक्करवाड,दिलीप ठाकूर,विजय गंभीरे,अशोक पाटील धनेगांवकर आदि मान्यवर उपस्थित होते.या भव्यदिव्य पुष्पहार व स्वागताची मतदार संघासह जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.