नांदेड – सुसंस्कारित विचारधारेच्या आधारावर मानवी जीवनात एक नाते निर्माण होत असते. रक्ताची नाती आपण निवडीत नाही तर ती नैसर्गिकरीत्या स्विकारावी लागतात. एका विशिष्ट वैचारिक पातळीवर नात्यांचे जाळे निर्माण होते. आंबेडकरी विचार हा अगणित लोकांना एकत्र आणून त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी नातेसंबंध जोडणारा विचार आहे. म्हणून रक्ताच्या नात्यापेक्षा विचारांचे नाते श्रेष्ठ असते, असे प्रतिपादन येथील धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांनी ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथ वाचनाच्या मध्यस्थी कार्यक्रमात केले. यावेळी खुरगाव येथील भंते चंद्रमणी, भंते सुदर्शन, सुदत्त, शिलभद्र, शिलानंद, सुदत्त, सारीपुत्त, सुयश, सत्यानंद, शाक्यपुत्त, शाक्यदर्शन, नगरसेवक उत्तम खंदारे, देवराव खंदारे, सरपंच रावण मोहिते, संभाजी डाखोरे, धम्मसेवक गंगाधर ढवळे, निवृत्ती लोणे, रवी बुरुड, देवानंद नरवाडे, धम्मगायक सातोरे, विश्वनाथ दुधमल, हंसराज दुधमल, सुमेध दुधमल, सोपान दुधमल, डॉ. मधुकर खंदारे आदींची उपस्थिती होती.
बौद्ध समाजाच्या वर्षावासकालीन ग्रंथ वाचनाच्या दरम्यान भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या धम्मदेसना, भोजनदान, आर्थिक दानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. येथील धम्मसंदेश व धम्मदान यात्रेचे आगमन पूर्णा तालुक्यातील धानोरा मोत्या येथे झाल्यानंतर बौद्ध उपासक उपासिकांनी भिक्खू संघाचे जोरदार स्वागत केले. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे दीप व पूष्पपूजन झाल्यानंतर याचनेनुसार भिक्खू संघाने उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. त्यानंतर भंते सारीपुत्त यांनी धम्मदेसना संपन्न झाली. भदंत पंय्याबोधी थेरो बोलताना म्हणाले की, मानवाने आपल्या जीवनात सतत कुशल कर्म केले पाहिजेत. त्यामुळे पापकर्म डोक्यात जन्म घेत नाहीत. कुशल कर्म मनामध्ये सर्वांप्रती मंगल कामना निर्माण करतात. इतरांविषयी मैत्रीची भावना निर्माण करतात. कुशल कर्मानेच सन्मान मिळतो, प्रतिष्ठा वाढते. दुसऱ्याचे दोष दाखवून आपण आपल्यातही दोष निर्माण करीत असतो. तेव्हा आपणच आपल्यातील दोष जाणून घेऊन काढून टाकले पाहिजेत. द्वेषभावना दोन वा अधिक लोकांत वैरत्वच निर्माण करते. सर्व लोक सुखी होवोत, सर्वांचे मंगल होवो कल्याण होवो अशा या विचारधारेचा प्रत्येकाने अंगिकार केला पाहिजे.
तिसऱ्या सत्रात भिक्खू संघाला आर्थिक व फळदान करण्यात आले. उपासक उपासिकांसाठी भोजनदान संपन्न झाले. आशिर्वाद गाथेनंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गंगाधर ढवळे यांनी केले तर संचलन व आभाराची धुरा हंसराज दुधमल यांनी सांभाळली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्योती दुधमल, वर्षा दुधमल, अरुणा दुधमल, वनमाला दुधमल, रमा खंदारे, बेबीताई खंदारे, शकुंतला दुधमल, रुपाली दुधमल, त्रिशिला खंदारे, धम्मा पंडित, भिमराव पंडित, शिवानंद हातागळे, अलका दुधमल, संगिता दुधमल, लताबाई खंदारे, पुष्पा गोडबोले, त्रिशला खरोटे, चौतराबाई दुधमल, पौर्णिमा दुधमल, श्रुती दुधमल, माया सदावर्ते, देवी दुधमल, वर्षा धुतराज, सुजाता सूर्यतळे, दैवशाला दुधमल, पार्वती खंदारे, सुजाता खंदारे, धुरपता दुधमल, भिमराव पंडित, पांडूरंग गोडबोले, लक्ष्मी दुधमल, हारणाबाई कवठेकर, रेखा खंदारे, डॉ. मुक्ताबाई बुरड, भिमाबाई दुधमल, अनुसया खंदारे, शिवनंदा खराटे, रुख्माजी दुधमल, संभाजी कंधारे, श्रीधर खंदारे, मधुकर खंदारे, उत्तम दुधमल आदींनी परिश्रम घेतले.
—
द्वेषाने द्वेषाचा परीघ वाढतच जातो – पंय्याबोधी
एखाद्या वस्तूचा किंवा विषयाचा दु:खकारक अनुभव घेतल्यानंतर तो अनुभव चित्तामध्ये सूक्ष्म संस्कार उत्पन्न करतो आणि चित्तामध्ये त्या दु:खकारक वस्तूप्रति द्वेषाची आणि तिचा त्याग करण्याची तीव्र इच्छा उत्पन्न होते. दु:खकारक वस्तूशी संबंध थोड्या काळापुरता असला तरीही त्यानंतर उत्पन्न होणारा संस्कार आणि त्या वस्तूप्रति द्वेषाची भावना कायमस्वरूपी चित्तामध्ये राहते. वस्तुत: सर्व जीवांना केवळ दु:खाप्रति द्वेष असतो. परंतु, ते दु:ख ज्या वस्तूमुळे किंवा व्यक्तीमुळे मिळते, त्या दु:खाच्या कारणांप्रति सुद्धा द्वेष उत्पन्न होतो. दु:खाशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीतीने संबंधित असणाऱ्या अनेक वस्तूंप्रति द्वेषाची भावना दृढ होत जाते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या मनात दुसऱ्या व्यक्तीबद्दल द्वेष असेल तर तो जिथे असेल, त्या रस्त्याने जाण्याचेही ती व्यक्ती टाळते. अशा प्रकारे मूलत: दु:खासाठी असणाऱ्या द्वेषाचा परीघ वाढतच जातो.