ऐतिहासिक मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीस नवी उभारी देण्यासाठी प्रयत्न करणार-ना. अशोकराव चव्हाण


नांदेड – प्राचीन, ऐतिहासिक महत्व असलेल्या मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीस नवी उभारी देण्यासाठी राज्य शासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे .


शहरातील व्यकटेश नगर भागातील मराठवाडा खादी ग्रामोद्योग कार्यालयास सोमवार दि. 16 ऑगस्ट रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली आहे . यावेळी मराठवाडा खादी ग्रामोद्योगाचे ईश्‍वरराव भोसीकर ,हंसराज वैद्य ,जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर , काँग्रेसचे प्रवक्ता संतोष पांडागळे आदी उपस्थितीत होते .  


यावेळी मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे ईश्‍वरराव भोसीकर यांनी  राष्ट्रध्वज निर्मिती केंद्रात तयार होणारा तिरंगा ध्वज देशातील 16 राज्यात पाठविण्यात येत असल्याचे सांगितले. या समवेतच मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या अन्य प्रश्‍नांकडेही लक्ष वेधले.
या प्रसंगी पालकमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की यंदाचे वर्ष देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या वर्षाच्या निमित्ताने ऐतिहासिक महत्व असलेल्या मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे पुनर्जिवितासाठी राज्य शासनाकडून मदत करण्यात येईल. या संस्थेतील बंद पडलेले उपक्रम सुरु करण्यासाठी पालकमंत्री या नात्याने संपूर्ण मदत मिळवून देण्याचा शब्द दिला.

या वास्तूचे जुने रुप कायम ठेवून इमारतींना बळकटी देण्यासंदर्भात कायम करता येईल या बाबतचा अहवाल 15 दिवसांत सादर करावा असे निर्देश ना.चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *