प्रदिर्घ वसंत विचार व्याख्यानमालेची १८ आँगस्ट रोजी सांगता.

अहमदपूर ( प्रतिनिधी प्रा भगवान आमलापुरे)

हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्मंत्री वसंतराव नाईक यांच्या १०८ व्या जयंती निमित्त दि ०१ जुलै ते १८ आँगस्ट २१ , ( जयंती पासून स्मृती दिनापर्यंत,) या प्रदिर्घ काळात चालू असलेल्या वसंत विचार व्याख्यानमालेची दि १८ आँगस्ट २१ रोजी सांगता होणार आहे.

भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था आणि समस्त बंजारा सामाजिक संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदिर्घ आणि आभासी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेच्या नावाने एक नवीन ईतिहास निर्माण होत आहे. किंबहुना एक गोष्ट लक्षात येते आहे ती म्हणजे महानायक, हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १०८ व्या जयंती निमित्त त्यांच्या नावाने चालवली जात असलेली ही प्रदिर्घ व्याख्यानमाला होय. शिवाय या आभासी व्याख्यानमालेत जाणीवपूर्वक महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. हा पण एक नवीन प्रयोग आणि ईतिहास म्हणावा लागेल.

दि ०१ आँगस्ट २१ रोजीच्या व्याख्यानात या उपक्रमाचा हेतू सांगण्यात आला. तो आसा, सर्व जातीसमूहास वसंतराव नाईक यांच्या कार्याची माहिती व्हावी, समाजात प्रेरणा निर्माण व्हावी, समाज एका व्यासपीठावर आणणे आणि प्रामाणिक नव – नेतृत्व तयार करणे.

शिवाय,” जीसकी लेखणी ,उसकी कहाणी ” असही म्हणतात. वसंतराव नाईक यांच्या कार्याला उजाळा देऊन प्रेरणा निर्माण करणे.या बहुजन नेत्याचे कार्य खूप मोठे आहे. पण त्यावर फारसे लिखाण झाले नाही. व्यापक आणि वैचारिक स्वरूपात जयंती साजरी करणे, विभुती पुजेपेक्षा विचार समाजात रूजावा.हा पण हेतू या उपक्रमाचा होता.

डॉ बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की जो समाज ईतिहासा पासून धडा घेत नाही त्या समाजास ईतिहास धडा देतो. शिवाय समाजात ज्या महापुरुषांचे विचार प्रस्थापित आहेत, तो समाज शासक बनतो. शासक बनण्यासाठी आगोदर विचार प्रस्थापित करावे लागतात.

नौकरी करणाऱ्या बांधवांनी सामाजिक भान ठेवावे. प्रगतीचा रथ पुढे ओढायला हवा. कर्मचारी सध्या पुर्वी कधीही नव्हता एवढा संकुचित आणि आत्मकेंद्रित झाला आहे.हे पण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते.

हा आत्मकेंद्रित पणा झटकून टाकावा. हा पण या व्याख्यानमालेचा हेतू होता. गेली ४८ दिवस ही आभासी व्याख्यानमाला विनाव्यत्यय आणि विनाखंड चालू आहे. यात डॉ, वकील, प्राध्यापक, संपादक, शिक्षणतज्ज्ञ, लेखक यांनी सहभाग नोंदवून वैचारिक जागर घडवून आणला. ते वक्ते असे, श्रावण देवरे,डॉ दिनेश राठोड, प्राचार्य राजेंद्र कुंभार, ज्ञानेश वाकुडकर, अँड पी बी कुंभार, दिनानाथ वाघमारे, डॉ श्रीमंत कोकाटे, डॉ संयोगिता नाईक, माजी कुलगुरू डॉ शरद निंबाळकर, डॉ के पी वासनीक, डॉ प्रभंजन चव्हाण, प्रदिप ढोबळे, उचल्याकार लक्ष्मण गायकवाड,प्रा रामदास गायकवाड, बाळासाहेब गावंडे, डॉ डी एन गंजेवार,डॉ वि.ना कांबळे, माजी कुलगुरू डॉ एस एन पठाण, प्राचार्य डॉ साहेब खंदारे, डॉ कैलास कांबळे, महावीर जोंधळे, उपराकार लक्ष्मण माने, डॉ अंबादास मोहिते, व्यंकटेश केसरी, दिल्ली, अँड दिलीप एडंतकर, सुधीर पाठक, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, काँ.राजन क्षिरसागर, शंकर बारवे, राधाकृष्ण मुळी, राजा माने, डॉ सुदाम आडसुळ, माजी कुलगुरू डॉ सुधीर गव्हाणे, प्रा मंजुषा आर्धापुरे, प्राचार्य राजाराम राठोड,अविनाश दुबे, निलेश गळमकर, प्रा वासुदेव डहाके, आरूण खोरे, निशीकांत भालेराव, डॉ व्यंकटराव मायंदे – माजी कुलगुरू, डॉ विलास भाले – माजी कुलगुरू, माजी आमदार उल्हासदादा पवार,संविधान तज्ञ डॉ सुरेश माने आणि हेमंत देसाई .

रोज २०० – २५० जण सहभागी असणाऱ्या ही आभासी व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिगांबर राठोड, राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मोहन चव्हाण, राज्य कार्याध्यक्ष टि व्ही राठोड, राज्य अध्यक्ष अशोक राठोड, राज्य उपाध्यक्ष एन डी राठोड यांनी पुढाकार घेतला. या वैचारिक मेजवानीच्या शेवटच्या पुष्पाचा लाभ घेण्याचे आवाहन एन डी राठोड, प्रा भगवान आमलापुरे यांनी केले आहे. व्याख्यानमालेच्या लिंकसाठी एन डी राठोड, मो ९९२१२४८६२८ आणि प्रा भगवान आमलापुरे यांच्या ९६८९०३१३२८ या नंबरवर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *