कंधार ; प्रतिनिधी
कालवश डॉ.प्रा.अनिल कठारे लिखित १०२ ग्रंथाचे दालन आंबेडकरवादी मिशन मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनी दि. 15 ऑगस्ट रोजी प्रारंभ होणार आहे.
15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता या दालनाचे उद्घाटन श्रीमती रमाताई अनिलकुमार कठारे यांच्या हस्ते संपन्न होईल. प्राध्यापक कठारे सर लिखित सर्व 102 ग्रंथ या ठिकाणी विद्यार्थ्यांना संदर्भ अभ्यासासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
कंधार या ठिकाणी इतिहासाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत प्राध्यापक अनिल कठारे हे संपूर्ण महाराष्ट्राचे बुद्धिवैभव होते, त्यांच्या अकाली निधनामुळे इतिहास संशोधन व लिखाण क्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.सरांचा वैचारिक लिखाण वारसा जपण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी प्रत्यक्ष कृती म्हणून त्यांच्या सर्व ग्रंथाच्या लिखाणाचं दालन आंबेडकरवादी मिशन मध्ये सुरू करण्यात येणार आहे.
याप्रसंगी प्राध्यापक बुद्धिजीवी मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती.
दीपक कदम
प्रमूख आंबेडकरवादी मिशन यांनी केली आहे.