फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील फुलवळ येथे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले होते त्यानुसार त्यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून दलित वस्तीत सी सी रस्त्यासाठी ५ लक्ष रुपये मंजूर केले , त्याच कामाचा आज ता. २५ ऑगस्ट रोजी नवी आबादी मध्ये शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सरपंच प्रतिनिधि नागनाथराव मंगनाळे , ग्रा.प.सदस्य प्रविण मंगनाळे, फुलवळ पत्रकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर डांगे, सचिव दिगांबर डांगे, मधुकर डांगे, विश्वांभर बसवंते , संदीप मंगनाळे, बालाजी बोरगावे, मारोती फुलवळे, सारंग मंगनाळे, पवन पटणे, हीराकांत मंगनाळे, कैलास बसवंते, गणेश रासिवंत, गोधने, पद्माकर कांबळे आदी उपस्थित होते.