नांदेड : २००९च्या विधानसभा निवडणुक..राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विरुद्ध तत्कालीन आमदार ..लोहा कंधार मधील ही निवडणूक राज्यभर गाजली..त्यावेळी अनेक राजकीय घडामोडी..घडल्या…प्रतापराव संपले..इथपर्यंत अटकल लावली गेली..पण प्रचार संपण्यापूर्वी शेवटची सभा… कंधार येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या जवळ ..लेकीचे भावनिक भाषण उपस्थित हजारों जणांना प्रभावित करणारे होते…अनेकांचे डोळे ओलावले..आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधातल राजकीय लढत हरली..पण त्यानंतर या भागाला आणि पर्यायाने जिल्ह्याच्या राजकारणात प्रतापरावांच्या कन्या प्राणिताताई देवरे -चिखलीकर यांचे नेतृत्व समोर आले.
वडेपुरीत प्राणिताताई यांचे झालेले अभूतपूर्व स्वागत..लोकांचा उत्साह..आणि त्यांचे कोणावरही टिकटिपण्णी न करणारे भाषण कंधारच्या सभेची आठवण जागृत करणारे होते..पण यावेळी राजकीय परिस्थिती तशी भिन्न..दोन वर्षापूर्वी या जिल्ह्याच्या राजकारणात प्रतापराव पाटील यांनी इतिहास घडविला..त्या निमित्ताने त्यांच्या कामाची पद्धत..कार्यकर्त्याना बळ देण्याची भूमिका जिल्ह्याला अनुभवता आली. प्रचार काळात आणि तदनंतर त्यांच्या कन्या प्राणिताताई देवरे -चिखलीकर व चिरंजीव प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या राजकीय कार्य गुणांची ओळखही झाली.
वडेपुरी गटात साडे चार वर्षांपूर्वी जेव्हा प्राणिताताई उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उरतल्या तेव्हा विरोधकांनी त्यांना नको – नको ते बोलले. जाहीर व जहरील्या टीका केली..आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनाही स्त्री शिक्षणाच्या प्रवाहात अशीच नको- नको ती बोलणी सहन करावी लागली होती .तीच सावित्री आज महिलांची प्रेरणास्थान आहे. प्राणिताताई यांनी ते सगळं सहन केलं. पूर्वी आमदारांच्या आणि आता खासदारांची लेक म्हणून नव्हे तर एक सोज्वळ..सज्जन..सुसंकृत….मन्याड – गोदाकाठच्या कन्या.. महिला कार्यकर्त्या म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. विरोध करणाऱ्यांना आपल्या कार्यातून प्राणिताताई यांनी जणू जवाब दिला हेच आता सिद्ध झाले आहे.
साधी राहणी.. उच्च विचार विरोधकांनाही प्रभावित करतात..हसतमुख आणि कोणतीही टीकाटिप्पणी न करता आपल्या कामात सदैव व्यस्त असलेल्या प्राणिताताई यांना कामाचा प्रचंड उरक आहे.
लोहा -कंधारसह जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. १९५२ पासून लोहा -कंधार भागातील एकही महिला नेतृत्व असा संघटनात्मक पातळीवर स्वतःची ओळख निर्माण करून पुढे येताहेत .प्राणिताताई याना कोणी भावी आमदार तर कोणी भावी खासदार असे समजतात. पण त्यांनी कधीच या मोहाला जाहीरपणे असो की मूक असो संमती दिली नाही.पण आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत त्याची उमेदवारी निश्चित आहे..आणि या दोन्ही तालुका त्यांना कोणत्याही मतदार संघात उभे राहा असे खुद्द त्या गटातील मतदार म्हणतील एवढे वातावरण त्यांनी मागील साडे चार नव्हे तर अकरा वर्षात तयार केले आहे.
खासदारांच्या अनुपस्थितीत प्रवीण पाटील व प्राणिताताई या भाऊ -बहिणींचा वाढदिवस मोठ्या उत्साह सामाजिक उपक्रम राबवून पार पडला .कार्यकर्त्याचे ..सामान्य जनतेचे प्रेम त्याच्यासोबत आहे हे यानिमित्ताने पुन्हा सिद्ध झाले.
लोहा -कंधार विधानसभा मतदारसंघ जसा चिखलीकर यांचा हक्काचा भाग..कुटूंब तसेच वडेपुरी- गटाला प्राणिताताई यांनी हक्काचा ..”माझा” या हक्काने मतदार संघ तयार केला .वाढदिवसाच्या निमित्ताने वडेपुरी येते गटातील सर्वच गावातील प्रमुख कार्यकर्ते यांनी क्रेन मधून पुष्पवृष्टी ..वाजतगाजत..औक्षण . करत प्रवीण पाटील ,प्राणिताताईं व प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या पत्नी वैशालीताई या चिखलीकर कुटुंबाचे अभूतपूर्व स्वागत केले..या स्वागताची ते भारावून गेले..प्राणिताताई यांचे अकरा वर्षा पूर्वीच्या भाषणाची झलक दिसली पुनरावृत्ती झाली पण यावेळी राजकिय परिस्थिती एकतर्फी नव्हती तर प्रतापराव जिल्ह्याचे खासदार झाले होते..नेतृत्वाचा पर्याय . जिल्ह्याला त्यांच्या रूपाने मिळाला आहे..दरम्यान अकरा वर्षाच्या या काळात पुलाखालून खूप पाणी वाहून गेले.वडेपुरीत ज्येष्ठ मार्गदर्शक माणिकराव मुकदम यांचे मार्गदर्शनही प्रभावी झाले. जसे चिखलीकर साहेबांची
तुम्ही जीवाचे रान केलेत आणि निवडून आणलात तसेच प्रवीण दादांच्या पाठीशी आपण एकजुटीने राहू या व येत्या विधानसभेत त्यांना आमदार म्हणून विधिमंडळात पाठवु या …..अशी भावनिक साद त्यांनी घातली..भावासाठी बहिणीने हाक दिली..जिवाभावाचा कार्यकर्ता सोबत आहेच .
राजकारणात सक्रिय असूनही नात्याची चौकट तुटू दिली नाही प्रवीण पाटील आणि प्राणिताताई या बहीण भावांनी कधी ओलांडली नाही..जाहीर टीका असो की अन्य कोणतेही अभद्र शब्द टाळले.
प्राणिताताई यांच्या संयमी व वैचारिक भाषणाची या निमित्ताने मतदार संघात आणि जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली.अकरा वर्षाच्या काळात राजकारणा पेक्षा सामाजिक व कौटुंबिक पातळीवर प्राणिताताई यांनी जी स्वतःची ओळख तयार केली ती पाहता आगामी काळात त्या जिल्ह्याच्या पर्यायाने राज्याच्या राजकारणात संघटना त्मक पातळीवर मोठी जबाबदारी सांभाळू शकतात..
मन्याड-गोदा काठच्या भूमीत राजकीय महिला नेतृत्व संघर्षातुन पुढे येते आहे.आगामी काळात आत्या-मामा समोर बहीण भाऊ यांचे मोठे आव्हान उभे राहणार आहे हे या दोघांच्या जोरदार झालेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने समोर आले आहे.