कंधार ; प्रतिनिधी
कोरोना च्या काळात सामान्य जनतेचे आरोग्य अबाधित राहावे या साठी वैदयकीय सेवा देणारे डॉक्टर, आरोग्यसेवक,परिचारिका ,कर्मचारी यांच्या अमूल्य योगदान मुळेच आपण कोरोना च्या दोन्ही लाटे मधून आपण सुखरूप बाहेर पडलो त्यांचे ते कार्य अद्वितीय आहे त्यांचे मोल होऊच शकत नाही असे प्रतिपादन जिल्हापरिषदेचे सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांनी कंधार येथील कोरोना योद्धांचा गौरव समारंभ व खासदार सुधाकर शृंगारे यांच्या स्थानिक विकास निधीतून देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण कार्यक्रमा वेळी कंधार येथे केले.
शांतिदुत प्रतिष्ठांन कंधार च्या वतीने कंधार येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव सन्मान कार्यक्रम दि २४आगष्ट रोजी ग्रामीण रुगणलाय च्या प्रांगणात जिल्हापरिषद सदस्या प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या वाढदिवसाचे अवचित्त साधून भव्य अश्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबुराव गंजेवार तर उदघाटक म्हणून डॉ आर डी सदावर्ते हे होते तर भाजपा जिल्हा सरचिटणीस,जिल्हापरिषद सदस्य प्रवीणपाटील चिखलीकर ,भाजपा महिलामोर्च्याच्या च्या प्रदेशउपाध्यक्ष तथा जिल्हापरिषद सदस्या प्रणिताताई देवरे चिखलीकर
यांच्या हस्ते डॉक्टर, वैधकीय कर्मचारी, परिचारिका ,आशा कार्यकर्त्या यांचा कोरोना योद्धा म्हणून स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला तसेच या वेळी लातूर लोकसभेचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या स्थानिक विकास निधीतून दिलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले,या प्रसंगी प्रणितताई चिखलीकर बोलताना म्हणाल्या की कोरोना काळात आले आप्त स्वकीय कोरोना च्या भीतीने रुग्णां पासून दूर होते त्या काळात आरोग्य कर्मचार्यांनीच मायेचा हात दिला आधार दिला त्यांच्या त्या कार्यबदल त्यांचा गौरव करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे असे त्या यावेळी म्हणाल्या .
तर या वेळी कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैधकीय अधीक्षक सूर्यकांत लोणीकर,भाजपा महिलामोर्च्याच्या जिल्हाध्यक्षा चित्रलेखा गोरे यांनी आरोग्य कर्मचारी यांच्या कार्याचा गौरव आपल्या मनोगतातून व्यक्त केला केला,तर कर्यक्रमाचे अध्यक्ष बाबुराव गंजेवार यांनी या उपक्रमाबद्दल चिखलीकर कुटुंबियांचे अभिनंदन करून सामाजिक ऋण आपल्या कार्यातून व्यक्त करणे म्हणजे समर्पित जीवन आहे असे ते यावेळी म्हणाले.
या कर्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी साहेबराव ढवळे, वैशालिताई चिखलीकर, कंधार नगरपालिकेचे उपाध्यक्ष म.जफारोद्दीन म.बाहोद्दीन, लोहा पंचायत समितीचे सभापती आनंदराव शिंदे,बालाजी झुंबाड,लोहा प स चे उपसभापती नरेन्द्र गायकवाड,यांच्या सह भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड,तालुका सरचिटणीस किशनराव डफडे, शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार, शहर सरचिटणीस मधुकर डांगे, भाजपा यु.मो.जिल्हाउपाध्यक्ष निलेश गौर,नगरसेवविका अनिता कदम, नगरसेवक सुनील कांबळे, शिक्षक आघाडीचे तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे,माजी नगराध्यक्ष चेतन केंद्रे,नगरसेवक प्रतिनिधी शेख आसेफ,माजी नगरसेवक बालाजी पवार,माजी नगरसेवक शेख मंनू,तालुका उपाध्यक्ष उमेश शिंदे,बालाजी तोटवाड, संभाजी जाधव,बालाजी तोरणे,व्यंकट नागलवाड, सागर कदम, , अड सागर डोंगरजकर, महेश मोरे,प्रवीण बनसोडे,कैलास नवघरे,महंमद जफर,किशनराव गित्ते,बालाजी तोटवाड, राजू लाडेकर ,सुनंदा वंजे,स्मिता बडवणे, कल्पना गित्ते,वंदना डुमाणे शोभा ठाकूर,प्रकाश घोरबांड,दत्ता डांगे,बालू पवार,श्याम शिंदे,शेख अरेफ, शेख फारूक,संभाजी घुगे,ज्ञानेश्वर मुंडे,सतिश कांबळे,यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी ,शांतिदुत प्रतिष्ठान चे सदस्य ,महिला,तालुक्यातील सरपंच व करकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या वेळी प्रास्ताविक भगवान राठोड यांनी केले तर आभार अड गंगाप्रसाद यन्नावार यांनी मानले