साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंती निमित्ताने अहमदपूर येथे विद्रोही कवी संमेलन संपन्न

अहमदपूर ; (प्रा.भगवान अमलापुरे )

समतावादी सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र राज्य शाखा अहमदपूर च्यावतीने बहुजन नायक अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंती निमित्ताने घेण्यात आलेल्या विद्रोही कवी संमेलनाचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध साहित्यिक तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबईचे सदस्य मा. श्री. विलास सिंदगीकर यांचा यावेळी मानाचा फेटा बांधून ,शाल, श्रीफळ ,पुष्पहार आणि ग्रंथ देऊन सत्कार करताना अहमदपूर शाखेचे अध्यक्ष प्राचार्य .तुकाराम हारगीले आणि कुटुंबीय यांनी सूहृदय सत्कार केला .

यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समीक्षक प्रा .डॉ .सुशील प्रकाश चिमोरे,ज्येष्ठ कवी समीक्षक प्रा.डॉ मारुती कसाब , कवी प्रा.डॉ. व्यंकट सूर्यवंशी ,विद्रोही कवी सतीश नाईकवाडे ,शाहीर अंकुश सिंदगीकर ,ज्येष्ठ कवी एन.डी .राठोड ,कवी प्रफुल्ल धामणगावकर ,कवी भगवान आमलापुरे, कवी प्रा. माधव वाघमारे आदि . मान्यवर साहित्यिक – कवी उपस्थित होते .

या कविसंमेलनाचे प्रास्ताविक प्राचार्य .तुकाराम हारगीले यांनी ,तर सूत्रसंचालन अंकुश पोतुरे यांनी केले .शेवटी आभार कुंदन हरगीले यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *