इंजि. शिवाजीराजे पाटील यांचा अंतर्नाद तनामनाला उभारी देणारा अप्रतिम ग्रंथ ठरेल – अँड. शिवाजी आदीक

Nanded

 नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू लिडरशिप इंन्स्टिट्युटचे मास्टर कोच तथा वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्रभुषण पुरस्कारप्राप्त देशप्रसिध्द स्तंभलेखक इंजि. शिवाजीराजे पाटील बाभळीकर लिखित आणि इंग्रजी नॉव्हेल्स व काव्यसंग्रह प्रकाशन क्षेत्रातील जगप्रसिध्द संस्था कँलनमँपल पब्लिशिंग, नोशनप्रेस व मावेरिक आर्टिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित होत असलेला पहिलाच मराठी साहित्य संग्रह अंतर्नाद हा मरगळलेल्या तनामनाला सकारात्मक उभारी देणारा अप्रतिम ग्रंथ ठरेल अशी प्रतिक्रिया सुप्रसिध्द कर सल्लागार अँड. शिवाजी आदीक यांनी दिली आहे.


करिअर गाईडन्स सेमिनार, सकारात्मक मानसिकता, आनंदी सहजीवन व व्यक्तिमत्त्व विकास शिबीरातील आपल्या अमोघ वक्तृत्वाने व अलौकिक लेखन कौशल्याने देशभरातील विद्यार्थी मित्रमैत्रिणी व तरुणांचे प्रिय वक्ते बनलेले प्रशिक्षक, विद्यार्थीह्रदयसम्राट इंजि. शिवाजीराजे पाटील बाभळीकर लिखित साहित्य संग्रह अंतर्नाद व ललितलेख संग्रह शिवास्त्र प्रकाशनाआधीच समाजमाध्यमात प्रचंड लोकप्रिय ठरत आहेत. त्यांच्या विविध विषयांवरील निवडक लेखांचा समावेश असलेला साहित्य संग्रह अंतरनाद चोखंदळ साहित्य रसिकांसाठी अमेझॉन व फ्लिपकार्ट या ऑनलाइन पर्चेस साईटवर लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती कँलनमँपल पब्लिशिंगचे वरिष्ठ अधिकारी मृणाल गोवंदे यांनी दिली. प्रतिथयश व नवोदित लेखक व कवींचे दर्जेदार साहित्य संग्रहित करून अंतरनादच्या रुपाने कँलनमँपल पब्लिशिंग प्रथमच मराठी साहित्य विश्वात दमदार एंट्री करण्यास उत्सुक आहे. शिवशंभुरत्न इंजि. शिवाजीराजे पाटील यांच्या असंख्य चाहत्यांसाठी अंतरनाद आगळीवेगळी पर्वणी ठरेल आणि अमेझॉन व फ्लिपकार्ट वरील पर्चेस लिंक ओपन झाल्यावर अंतरनाद ऑनलाइन मराठी पुस्तक विक्रीचा उच्चांकी विक्रम करेल असा विश्वास कर सल्लागार अँड. शिवाजी आदीक यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *