फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुका सरपंच संघटनेची नुकतीच नवनिर्वाचित कार्यकारणी जाहीर झाली असून त्याच कार्यकारणीतील सर्वांचा सत्कार फुलवळ येथे सरपंच विमलबाई मंगनाळे यांच्या नेतृत्वाखाली आज ता. २८ ऑगस्ट रोजी येथील ग्राम पंचायत कार्यालयात संपन्न झाला.
कंधार तालुका सरपंच संघटना अध्यक्षपदी ऍड मारोती पंढरे , सचिवपदी सौ राजश्रीताई मनोहरराव भोसीकर , उपाध्यक्षपदी ज्ञानोबा मुंडे ,कोषाध्यक्षपदी शंकर डिगोळे, फुळवल जिल्हा परिषद विभाग प्रमुखपदी तुळशीदास रासवंते यांची नियुक्ती करण्यात आली.
या सर्व नवनिर्वाचित पदाधिकऱ्यांचा फुलवळ गावच्या सरपंच सौ विमलताई नागनाथराव मंगनाळे यांच्या नेतृत्वाखाली येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांच्या वतीने सर्वांचा शाल , पुष्पहार , श्रीफळ देऊन सत्कार केला व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी सरपंच प्रतिनिधी नागनाथ मंगनाळे , ग्राम पंचायत सदस्य चंदबस मंगनाळे , बालाजी देवकांबळे , प्रवीण मंगनाळे , श्रीकांत मंगनाळे , शांताबाई जेलवाड , रोहित शिंदे , योगेश नंदनवनकर , परमेश्वर मंगनाळे , नागेश गोधने , वसंत मंगनाळे , राजू राठोड सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.