फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
नांदेड जिल्हा मित्र मंडळ या सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष केशव पाटील नंदनवनकर यांनी कोरोना महामारीत वडीलाचे छत्र हरपलेल्या मुलाला दत्तक घेऊन त्याच्या संगोपणाबरोबरच त्याची शैक्षणिक जबाबदारी उचलत जपला माणुसकीचा झरा.
या सामाजिक संस्थेचे १५ ऑगस्ट २००७ साली औरंगाबाद येथून छोटसं रोपट लावून सुरुवात केली. सामाजिक संस्थेची स्थापना नांदेड जिल्ह्यातील तरुण, सर्व धर्म समभाव या नावाखाली एकत्रित यावे या संकल्पनेतून ही सामाजिक संस्था उभा केली , नांदेड मधून बाहेर स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी नोकरीसाठी शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या अशा सर्व समाज बांधवांनी या संस्थेच्या नावाखाली एकत्रित यावे या संकल्पनेतून लोकांपर्यंत पोहोचण्याचा मानस ठेवून सामाजिक क्षेत्रात सेवा करण्याचे उद्दिष्ट ठेवून सर्व धर्म समभाव राखून समाजसेवा करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कार्याला सुरुवात केली.
नांदेड जिल्हा मित्र मंडळ
सामाजिक संस्था,महाराष्ट्र या सामाजिक संस्थेची कार्यपद्धती अशी होती की केशव पाटील नंदनवनकर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील अनेक जातीचे तरुण-तरुणी, उद्योजक,युवा, विद्यार्थी यांनी समाज सेवेला सुरुवात केली. सामाजिक संस्थेचे कार्य निराधारांना आधार देणे,अनाथांना मदत करणे ,आर्थिक असो शैक्षणिक असो का वृक्षारोपण,
सांस्कृतिक कार्यक्रम गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार , रक्तदान शिबिर , रुग्णांना फळ वाटप, दवाखान्यातील गरजूंना स्वतः तिथं जाऊन मदत करणे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज बीज उत्सव,
सर्व धर्मीय संत महापुरुषांची पुण्यतिथी व जयंती साजरी करणे अनाथांचे सामुदायिक विवाह सोहळे ,असे समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना गौरव पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन देणे असे कार्य वर्षानुवर्ष संस्थेचे चालत आलेले आहेत.
सामाजिक संस्थेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त म्हणजे १५ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांनी आर्थिक खर्च टाळून कोरोना महामारी काळातील कोरोना महामारी तील बळी गेलेले
नर्हरी उमाटे यांचं ता. २१ एप्रिल २०२० रोजी निधन झाल आणि त्यांचा परिवार उघड्यावर पडला , ते नांदेड जिल्ह्यातील रा. मु.वासरी ता. मुदखेड जिल्हा नांदेड येथील रहिवासी .
ते नाशिक येथे छोटासा व्यवसाय करायला गेले असताना कोरोना महामारीत त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मुलगा अर्णव उर्फ आदित्य नरहरी उमाटे इयत्ता दुसरीत शिकत होता या अर्णवला नांदेड जिल्हा मित्र मंडळ सामाजिक संस्थेचे केशव पाटील नंदनवनकर यांनी आपल्या संस्थेमार्फत दुसरी ते बारावी पर्यंत चे त्याचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी घेतली आहे.
समाजातील गरजूंना जर मदतीचा हात पाहिजे असेल त्यांनी नेहमीच नांदेड जिल्हा मित्र मंडळ सामाजिक संस्थेकडे एक आशेचा किरण म्हणूनच पाहावे असे केशव पाटील नंदनवनकर यांनी सांगितले.