कंधार : प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील बारूळ येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मॅनेजर यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कोणतेही कर्ज न वाटप करण्याचा विडा पवने यांनी उचलला का? असे ग्रामीण भागातील शेतकरी बोलले जात आहेत. पिककर्ज वाटप करण्याचे आदेश जिल्हा अधिकाऱ्यांनी दिले असतांनाही देखील बारूळचे मॅनेजर पवने हे आपल्या मर्जीतील व आर्थिक माया देईल त्या दलालामार्फत पिक कर्ज वाटप करण्याचा सपाटा मॅनेजर यांनी चालवला आहे.
यामूळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा यांना पिक कर्ज घेण्यास टाळाटाळ होत असतांना यावर आता पर्यंत कोणीही लक्ष न दिल्यामूळे बारूळ येथील मॅनेजर पवने यांच्या तक्रारीचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांना शेतकरी कामगार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष योगेश पाटील नंदनवनकर यांनी दिले आहे.
त्यामूळे बँकेचे मॅनेजर पवने हे शेतकऱ्यांना तात्काळ पिककर्ज वाटप न केल्यास त्यांना बँकेत डांबून ठेवण्याचा इशारा ही योगेश पाटील नंदनवनकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
कंधार तालुक्यातील बारूळ येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मॅनेजर हे मनमानी कारभार करत असून शेतकऱ्यांना पिक कर्ज व इतर कर्ज देण्यास नकार देत आहेत व आरेरावीची भाषा करून शेतकऱ्यांचा अपमान करून त्यांना बँकेच्या बाहेर जाण्याचा रस्ता महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मॅनेजर पवने हे करत आहेत.
त्यामूळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी अपमानीत व निराश होत आहे. त्यामुळे अशा मुजोर बँक शाखा अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबीत करून बारूळ येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चांगल्या अधिकाऱ्याची तात्काळ नेमणुक करण्यात यावी अन्यथा काही अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण ? असा सवाल नंदनवनकर यांनी निवेदनाद्वारे केला आहे.
बँकेचे मॅनेजर आरेरावीच्या भाषेत शेतकऱ्यांना अश्लिल भाषेत बोलणारे मॅनेजर तात्काळ निलंबीत करा, मा. जिल्हाधिकारी साहेब व क्षेत्रिय व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक संगमकर साहेब यांनी मागच्या झालेल्या बैठकीत सर्व बँक मॅनेजर व वरिष्ठ अधिकारी तात्काळ कर्ज वाटप करण्याचे आदेश दिले असतांना देखील बारूळ येथील बँकेचे मॅनेजर हे जिल्हाधिकारी नांदेड यांचे आदेश देखील पाळत नाहीत.
ऑगस्ट महिना संपत आला असताना देखील शेतकऱ्यांना पिककर्ज नाकारणाऱ्या व अरेरावीच्या भाषेत वागणुक देणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा बारूळ, ता. कंधार येथील मॅनेजर पवने यांना तात्काळ निलंबीत न केल्यास शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बारूळ येथील बँकेसमोर सर्व शेतकऱ्यांच्या समवेत बँक अधिकाऱ्यांना ताळेबंद करून ठेवण्यात येईल अशा इशारा देण्यात आला आहे.