फुलवळ येथिल मंदाकिनी शेळगावे यांचे अल्पशा आजाराने अकाली निधन.

फुलवळ (धोंडीबा बोरगावे )

सौ . मंदाकिनी गजानन शेळगावे फुलवळकर वय ३० वर्ष रा.फुलवळ ता. कंधार , जि. नांदेड यांचे आज ता. २७ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने मुंबई येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.या घटनेने शेळगावे कुटुंबावर दुःखाचा डोंगर पडला आहे.

गेली काही दिवसांपासून मंदाकिनी यांना मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते , उपचारादरम्यान त्यांची शारीरिक प्रकृती त्या उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने ता. २७ ऑगस्ट रोजी अत्यंत कमी वयातच त्यांची प्राणज्योति मावळली .

त्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये नांदेड वर्कशॉप येथे कार्यरत होत्या. मध्यंतरीच्या काळात त्यांना काही शारीरिक वेदना होत असल्याने त्यांना मुंबई येथे उपचारासाठी दाखल केले होते.

त्या श्री शिवाजी प्राथमिक शाळा नांदेड येथे सहशिक्षक असलेले गजानन जिवलगराव शेळगावे यांच्या धर्मपत्नी होत . या दाम्पत्यांना दोन चिमुकले बाळ असून त्यात एक मुलगी व दुसरा मुलगा आहे. आईच्या अकाली सोडून जाण्याने त्या लेकरांकडे पाहून प्रत्येकालाच शोक आवरत नव्हता. शेळगावे परिवाराबरोबरच फुलवळ गावावर शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात पती ,एक मूलगा , एक मुलगी , सासूबाई असा परिवार आहे.

त्यांचे पार्थिव मुंबईवरून फुलवळ या मूळगावी आणल्यानंतर ता. २८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *