नांदेड ; प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी आ.अमरनाथ राजूरकर व सचिवपदी ॲड.सुरेंद्र घोडजकर यांची पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नुकतीच निवड केली.
निवड केल्याबद्दल या दोघांनी पुष्पगच्छ देवून पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे आभार मानले.यावेळी माजी मंत्री डी.पी.सावंत,जिल्हा परिषदेचे बांधकाम व शिक्षण सभापती संजय बेळगे, समाज कल्याण सभापती ॲड.रामराव नाईक,माजी उपमहापौर उमेश पवळे आदीची उपस्थिती होती.