प्रा.डॉ.रामकृष्ण बदने यांना विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षक (ग्रामीण) पुरस्कार जाहीर

कंधार प्रतिनिधी/उमर शेख

मुखेड -ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान)महाविद्यालय वसंतनगर ता.मुखेड जि.नांदेड येथील माजी प्राचार्य तथा हिंदी विभागात कार्यरत प्रोफेसर डॉ. रामकृष्ण बदने यांना नुकताच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा उत्कृष्ट शिक्षक (ग्रामीण) हा पुरस्कार जाहीर झाला आहे.


उच्च शिक्षण क्षेत्रात हा पुरस्कार अत्यंत मानाचा मानला जातो. जे प्राध्यापक ग्रामीण भागात राहून संशोधन ज्यात विद्यावाचस्पती (पी-एच.डी.)चे मार्गदर्शन, विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिका तील लेखन, विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांतील सहभाग, तसेच अश्या परिषदांचे आयोजन, राष्ट्रीय सेवा योजनेतील कार्य, प्रशासकीय क्षेत्रातील कार्य, संस्था अंतर्गत कार्य, सामाजिक कार्य, अभ्यासक्रम निर्मितीतील सहभाग, विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावरील कार्य, लघु व मोठे संशोधन प्रकल्प, विद्यार्थी विकासात सहभाग व अन्य कार्यात अग्रेसर असतात अशांची निवड बाहेरच्या विद्यापीठातील कुलगुरू व तत्सम व्यक्तिंकडून केली जाते.


या सर्व निकषांवर खरे उतरत शैक्षणिक वर्ष २०२० साठी प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांचे शैक्षणिक क्षेत्रातील अनेक वर्षातील कार्य पाहून हा पुरस्कार जाहीर झाला आहे.प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांचा विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून नावलौकिक आहे. त्यांनी आई या विषयावर महाराष्ट्रभर शेकडो व्याख्याने दिली आहेत. त्यांना आईकार म्हणुनच सर्वत्र ओळखले जाते. तसेच आतापर्यंत यांना २८ पेक्षा अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. नांदेड व मुखेडच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व साहित्यिक चळवळी ते सक्रिय असतात.त्यांनी प्राचार्य म्हणून ही उत्कृष्ट कार्य केले आहे. अनेक पुस्तकांचे लेखन त्यांच्याकडून झाले आहे.

विविध वृत्तपत्रांतून ते नेहमी प्रासंगिक लेखन ही करत असतात. व्याख्यान,कीर्तन व प्रवचनातून लोक शिक्षकाची भूमिका ते पार पाडताना दिसतात.अशा बहुगुणी प्राध्यापकाची विद्यापीठाने केलेली निवड सार्थ असल्याचे बोलले जात आहे.


त्यांच्या या पुरस्कार निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन विमुक्त जाती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कर्मवीर किशनराव राठोड, संस्थेचे सचिव प्राचार्य गंगाधररावजी राठोड, मुखेड कंधार विधानसभा परिक्षेत्राचे विद्यमान आमदार डॉ.तुषारजी राठोड,संस्थेचे सहसचिव गोवर्धन पवार,संस्थेचे सदस्य तथा जि. प.सदस्य संतोषभाऊ राठोड, संस्थेचे सदस्य मुख्या.गोविंद पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास राठोड,मराठवाडा भूषण डॉ.दिलीपराव पुंडे,प्राचार्य डॉ.शिवानंद अडकिणे,प्राचार्य डॉ.मनोहर तोटरे, उपप्राचार्य अरुणकुमार थोरवे, उपप्राचार्य डॉ.संजीव डोईबळे,माजी प्राचार्य डॉ. देवीदास केंद्रे, माजी प्राचार्य डॉ.मधुकर राउत, माजी प्राचार्य तथा सिनेट सदस्या डॉ. आशाताई गीते, सिनेट सदस्य प्रा. संजीव डोईबळे,हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. गुरुनाथ कल्याण, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ.पंडित शिंदे,स्टाफ सेक्रेटरी डॉ.व्यंकट चव्हाण,सहस्टाफ सेक्रेटरी प्रा.सौ. शिल्पा शेंडगे,

मायबोली मराठी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव अंबुलगेकर, विद्यमान सचिव एकनाथ डुमणे व सर्व सदस्य,वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष डॉ.राहुल मुक्कावार व सर्व सदस्य,पत्रकार संघाचे अध्यक्ष अॅड.संदिप कामशेट्टे व अॅड.सूनिल पौळकर व सर्व पत्रकार, रोटरी क्लब मुखेडचे अध्यक्ष व सर्व सदस्य, मानवता विचार मंचाचे बालाजी लींगनवाड, शिवकुमार बंडे,संग्राम मस्कले व सर्व सदस्य,जिप्सी ग्रूपचे अध्यक्ष शेखर पाटील व सर्व सदस्य,सूप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार व सर्व सदस्य,संजीवन सकाळचे अध्यक्ष महावीर शिवपुजे व सर्व सदस्य, विमुक्त जाती सेवा समितीच्या सर्व शाखांचे शाखाप्रमुख व त्यांचे सर्व सहकारी, मुखेड व परिसरातील सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी,महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी,आप्तेष्ट, मित्र परिवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *