ईश्वर गीते यांचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून महावितरण’कडून सन्मान

लोहा ; (एकनाथ तिडके)


    लोहा येथील विद्युत वितरण कंपनी महावितरण येथे कार्यरत असलेले प्रधान तंत्रज्ञ ईश्वर रामराव गीते यांना महावितरण’कडून उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी म्हणून सन्मानित करण्यात आले आहे , विद्युत भवन नांदेड यांच्या माध्यमातून मुख्य अभियंता यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून त्यांचा सन्मान केला आहे.   मागील 14 वर्षापासून लोहा येथे महावितरण मध्ये कार्यरत असलेले ईश्वर रामराव गिते यांनी विद्युत वितरण कंपनीने नेमून दिलेल्या कामानुसार मेहनतीने व चिकाटीने अतिशय उत्कृष्ट कर्मचारी म्हणून कामगिरी बजावली आहे कुठल्याही ग्राहकाची त्यांच्याबाबत आजपर्यंत तक्रार नाही, ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देत असताना त्यांनी दाखवलेली कार्यतत्परता, कर्तव्यदक्षता व कामाप्रती असलेली निष्ठा यामुळे त्यांना  विद्युत भवन नांदेड यांच्याकडून  ‘उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी’ (2020-21)  म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.     याबाबत त्यांचे सुरेश घुगे, संजय घरजाळे,जाधव साहेब,मारोती गायकवाड, विक्रम ढवळे ,शंक,दत्ता शेळके,शुभांगी धुमाळ,कृष्णा गिते, यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *