भारतीय क्रिकेट संघांचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा?
नवी दिल्ली ;
भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला, तरी तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. त्यामुळे अचानक निवृत्ती जाहीर करुन धक्का बसलेल्या चाहत्यांना हा थोडासा दिलासा म्हणावा लागेल.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने अनेक सामने जिंकले आहेत. 2008 ते 2014 दरम्यान धोनी कसोटी सामन्यांचा कर्णधार होता. त्याने 2007 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत टी-20 ट्रॉफी जिंकली होती. 2010 आणि 2016 साली त्याने आशिया कप जिंकला आहे. 2011 साली त्याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2013 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील जिंकली होती.
39 वर्षीय महेंद्रसिंह धोनीने भारतीय क्रिकेटला नवं आयाम दिलं. धोनीने भारताला पहिला टी 20 विश्वचषक, 2011 मध्ये वन डे विश्वचषक आणि भारतीय संघाला कसोटीमध्ये अव्वलस्थान असं सर्व काही मिळवून दिलं. धोनीने तीनही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाची धुरा सांभाळली.
महेंद्रसिंग धोनी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेणार निवृत्ती.
☑️पण आयपीएल खेळत राहणार!
☑️धोनीने इंस्टग्राम या सोशल माध्यमातून केली निवृत्तीची घोषणा ☑️महेंद्रसिंग धोनी अगोदरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
☑️ आयपीएल सोडून सर्वच प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीची निवृत्तीची घोषणा