कंधार ; प्रतिनिधी
धाकले पंढरपूर म्हणून ओळख आसलेल्या उमरज ता.कंधार येथे नामदेव महाराज मठ संस्थानचे ( प्रती पंढरपूर) आज सप्ताह समाप्ती कार्यक्रम संपन्न झाला.
त्या कार्यक्रमास मठपती श्री संत एकनाथ नामदेव महाराचे दर्शन घेतले व महाराजांचा आशीर्वाद माजी सरपंच फुलवळ बालाजी देवकांबळे यांनी घेतला.
आगामी पंचायत समिती मध्ये फुलवळ गणातून निवडणूक लढवण्याची इच्छा यावेळी बालाजी देवकांबळे यांनी व्यक्त केली तेव्हा संत एकनाथ गुरु नामदेव महाराजांनी आशीर्वाद दिला.
वेळोवेळी आपल्या विविध प्रकारच्या कार्यातुन ओळख निर्माण करणारे फुलवळचे माजी सरपंच बालाजी देवकांबळे विवीध क्षेत्रात आघाडीवर असतात.गत निवडणूकीत जिल्हा परीषद सदस्य यासाठी कॉग्रेस पक्षाकडून तिकीट मिळाले खरे मात्र शेवटच्या टप्यात काहींनी राजकारण करत बालाजी देवकांबळे यांना धोका देत गद्दारी केली होती.मात्र आता पंचायत समिती निवडणूकीत आपले नशीब अजमावण्याची तयारी फुलवळ गणातुन चालवली आहे.आज संत महंत एकनाथ महाराज यांचा आशीर्वाद घेऊन तयारी चालू केली असल्याची प्रतिक्रिया यावेळी दिली.
यावेळी कार्यक्रम साठी सरपंच बालाजी भुजंगा देवकांबळे ग्रामपंचायत सदस्य फुलवळ सह सर्व बालाजी चुकलवाड ,योगेश पाटील ,नितीन शिंदे ,मिर्झा जमीर बेग,एस.पी.केंद्रे , सुभाष वाघमारे,महेंद्र बोरोळे,महंमद सिंकदर, मुरलीधर थोटे आदीसह पत्रकार मंडळीची उपस्थिती होती.