अहमदपूरकर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भक्तीस्थळावर धर्मसभा


अहमदपूर (प्रा.भगवान आमलापूरे प्रतिनिधी )

वसुंधरारत्न, राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त तथा तारखेप्रमाणे प्रथम पुन्यस्मरण दिनाच्या निमित्ताने आज दि ०१ सप्टें २१ रोजी सकाळी ११ : ०० वाजता अनेक शिवाचार्यांच्या उपस्थितीत येथील भक्तीस्थळावर धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आली आहे.
डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त ( तारखेप्रमाणे प्रथम पुण्यस्मरण ) सकाळी ०७ : ०० वाजता अभिषेक, ०९ : ०० वाजता शिवकिर्तन आणि ११ : ०० वाजता धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या धर्मसभेस सबंध महाराष्ट्रातील २१ शिवाचार्य उपस्थित राहणार आहेत. ती असे, श्री ष ब्र १०८ सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, साखरखेड्र, श्री ष ब्र १०८ निळकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वर, श्री ष ब्र १०८ सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुंदा, श्री ष ब्र १०८ सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर, श्री ष ब्र १०८ डॉ विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मांजरसुंभा, श्री ष ब्र १०८ शिवलिंग शिवाचार्य महाराज बेळंकी, श्री ष ब्र १०८ शंभुलिंग शिवाचार्य महाराज आंबेजोगाई, श्री ष ब्र १०८ करबसव शिवाचार्य महाराज ,लासीन मठ, वसमत, श्री ष ब्र १०८ शंकरलिंग शिवाचार्य महाराज शिरूर अनंतपाळ, श्री ष ब्र शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीर, श्री ष ब्र १०८ डॉ विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड, श्री ष ब्र १०८ महादेव शिवाचार्य महाराज वाई, श्री ष ब्र १०८ वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज ,थोरला मठ,वसमत, श्री ष ब्र १०८ काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरी, श्री ष ब्र १०८ प्रभुदेव शिवाचार्य महाराज माढा, श्री ष ब्र १०८ रामलिंग शिवाचार्य महाराज परांडकर, श्री ष ब्र १०८ महादेव शिवाचार्य महाराज कळमनुरी, श्री ष ब्र १०८ गंगाधर शिवाचार्य महाराज औंध, श्री ष ब्र १०८ गुरूपाखेश्वर शिवाचार्य महाराज गीरगाव, श्री ष ब्र १०८ मनीकंठ शिवाचार्य महाराज दहीवडी, श्री ष ब्र १०८ शिवलिंग शिवाचार्य महाराज टाकळी, श्री ष ब्र१०८ . माहेश्वरमुर्ती श्री राजशेखर स्वामी उत्तराधिकारी वीरमठ राजुर, माहेश्वरमुर्ती श्री अभिषेक स्वामी उत्तराधिकारी गुरूबुद्धी स्वामी मठ हाडोळती यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *