गडगा/ प्रतिनिधी: स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने दिल्या जाणारा ग्रामीण विभागाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रा. डॉ.रामकृष्ण बदने यांना जाहीर करण्यात आल्याबद्दल गडगा नगरीचे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पन्नासे यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कारमूर्ती म्हणून डॉ.रामकृष्ण बदने हे होते तर व्यासपीठावर डॉ.पंडित शिंदे, खरेदी विक्री संघाचे मा.चेअरमन बालाजीराव एकाळे,माजी सरपंच रामराव कोरे,शिवसेना उपतालुका प्रमुख शिवाजीराव पन्नासे,चेअरमन मोहनराव पा. जाधव,शेखलाल पटेल,विलास पाटील,अशोक कोरे, सादिक सय्यद, मा.पं.स. सदस्य शिवराज फुलारी, कोंडीबा कोरे,माजी सरपंच विठ्ठल भांगे, केरबा मनुरे यांसह आदी उपस्थीत होते.
यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख शिवाजी पन्नासे म्हणाले की विद्यापीठाच्या वतीने जीवनभर विशेष उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विद्यापीठ कार्यक्षेत्रातील बदने सरांच्या रूपाने एका गुणवान व्यक्तीची पुरस्कारांसाठी निवड केल्याचे मनस्वी समाधान लाभले असून येणाऱ्या काळात उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो अशी इच्छा शिवसेना उपतालुका प्रमुख शिवाजीराव पन्नासे यांनी प्रा.डॉ. रामकृष्ण बदने यांच्या सत्कार प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
बदने सर हे केवळ वर्गापुरतेच शिक्षक नसून ते लोकं शिक्षकाची भूमिकाही पार पाडतात व वाचन,लेखन,व्याख्यान,किर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी प्रबोधनाचे मोठे कार्य केले आहे. त्यामुळेच असे सत्कार घडून येतात असे मत डॉ.पंडित शिंदे यांनी व्यक्त केले.
सत्कारमूर्ती म्हणून प्रा.डॉ रामकृष्ण बदने म्हणाले की आपले प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे.नक्कीच यामुळे मला आणखीन जास्तीचे काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे. ग्रामीण भागांमध्येही गुणवत्ता कमी नाही. त्यांच्यातील गुण हेरून त्यांना त्या दृष्टीने तयार केले तर ग्रामीण भागातील मुले मोठ्या पदावर जाऊ शकतात व ते भविष्यात कुठेही कमी पडत नाहीत याचा अनुभव मी स्वतः घेतला असून शिवाजीराव पन्नासे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज हिताचे अनेक उपक्रम राबवतात. समाजाप्रती तळमळ असणारा व्यक्ती म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. त्यांनी आयोजित केलेला सत्कार माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे अशी भावना व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिवाजी पन्नासे यांनी केले तर आभार अशोक कोरे यांनी मानले.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.