मोहम्मद कामरानने परिस्थितीवर मात करत मिळवले घवघवीत यश.

कंधार ; प्रतिनिधी

मोहम्मद कामरान याने कठीण परिस्थितीत मिळवलेले यश हे खरंच आदर्शवत आहे, म्हटले तर वावगे ठरणार नाही. मोहम्मद कामरान गुलाम शाहिंदर याचे प्राथमिक शिक्षण हे शिफा उर्दू प्रायमरी स्कूल लेबर कॉलनी नांदेड, माध्यमिक दहावी पर्यंत चे शिक्षण युसुफिया हायस्कूल पिर-बुऱ्हाण नांदेड येथे झाले. दहावी मध्ये पहिले यश संपादित करीत ८२ टक्के गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाल्यानंतर या गुणवत्तेच्या आधारावर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय नांदेड येथे डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरिंग पात्र झाला.लहान वयातच घरची आर्थिक परिस्थितीची जानीव असल्याने आई-वडिलांच्या विश्वासात पात्र ठरवत गुणवत्तेचा शिखर चढत राहिला अंतिम परीक्षेत.९३ . ४२ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

परिस्थिती कितीही बिकट असली तरीही काही माणसं जिद्द सोडत नाही, काळ अग्निपरीक्षा घेत असते ,मात्र त्यातूनही काहीजण सहजतेने स्वकर्तुत्वाच्या व चिकाटीच्या जोरावर अगदी सुलाकून निघतात.येणाऱ्या संकटाना न डगमगता थेट भिडणारी आणि आभाळ कोसळले तरी पाय रोवून उभं राहणारी माणसं इतरांसाठी आदर्श ठरत असतात. परीक्षा ही तर बळ देत असते फक्त एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी अभ्यासूवृत्ती आणि चिकाटी असली पाहिजे मग जिद्दी समोर बिकट परिस्थितीलाही देखील आपले गुडघे टेकून हार पत्करते हेच पुन्हा एकदा मोहम्मद कामरान याने मिळवलेल्या घवघवीत यशावरून सिद्ध झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *