मंदिर अजून वर्ष भर नाही उघडले तर चालतील पण शाळा सुरू करा.:- डॉ. राजन माकणीकर

मुंबई दि (प्रतिनिधी) मंदिरे अजून काही वर्षे उघडले नाहीत तरी चालतील पण शाळा सुरू कराव्यात अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक या आंबेडकरी विचाराच्या नोंदणीकृत पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी सोसिएल मेडियाद्वारे केली आहे.

डॉ. माकणीकर म्हणाले की, कोरोना महामारीच्या दहशतीने संपूर्ण जग त्रासले गेले, जीवित हानी महाभयंकर झाली, अनेक देशांनी कोरोना महामारीवर प्रभावीपणे मात केली. आपापल्या देशाला लावलेले कुलूप आता सर्वांनी उघडले आहे.

भारतात मात्र कोरोना महामारीचा कहर अजून नव्याने जाणवतच आहे, यामुळे शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. बालगोपाळाच्या मनात शाळेत न जाण्याची इच्छाशक्ती प्रबळ होत आहे. यातून देश शैक्षणीक गुणवत्ता गमावून बसेल, अशी भेडसावत असतांना शाळा उघडण्याऐवजी मंदिरे उघडण्याची भाषा केली जात आहे.

विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर असेही म्हणाले की, मंदिरे अजून काही वर्षे नाही उघडली तर चालतील पण कोरोनाविरुद्ध तात्काळ प्रभावी उपाययोजना करून सरकारने शाळा त्वरित उघडाव्यात. सरकारला शैक्षणिक महत्व कळत नसेल तर राजीनामा देऊन टाळ कुटत बसावे अशी प्रतिक्रिया राज्य सरकारला दिली.

ऑनलाईन शिक्षण पद्धती म्हणजे नुसता पोरखेळ असून हा बालिशपणा सरकारने थांबवावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक च्या वतीने संबंध राज्य भर टाळ व घंटा नाद आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *