फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील फुलवळ येथील भुमीपुत्र मुक्तेश्वर तुकाराम डांगे यांना नुकतेच महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय हिंदी यूनिवर्सिटी वर्धा यांच्या वतीने मॅनेजमेंट ऑफ ऑरगॅनिक सर्टिफिकेट या विषयात पी.एच.डी पदवी जाहीर करण्यात आली आहे.
याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातुन कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
बालपणापासुनच अतीशय चाणाक्ष बुद्धी असलेला विद्यार्थी म्हणुन मुक्तेश्वर डांगे यांची सर्वांना ओळख होती. शालेय जीवनामध्ये त्यांनी विविध शैक्षणीक स्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार मिळविले आहेत.
त्यांचे प्राथमीक शिक्षण येथीलच जि.प.कें.प्रा. शाळेत तर माध्यमिक शिक्षण म. बसवेश्वर विद्यालय येथे झाले आणि उच्य माध्यमीक शिक्षण श्री.शिवाजी काॅलेज कंधार येथे झाले.
त्यानंतर पदवीचे शिक्षण बी.एस.सी ॲग्री लातुर – परभणी विद्यापीठ येथे तर एम.एस.सी ॲग्री बदनापुर कृषी विद्यापीठ परभणी जि.परभणी येथे झाले.
अतीशय अभ्यासु व गुणवत्ता संपन्न व्यक्तीमत्व अशी ओळख असनारे मुक्तेश्वर डांगे यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल मित्रपरीवार, प्राध्यापक वर्ग, परीवारातील सदस्यातुन अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे व आनंद व्यक्त केला जात आहे.