मानसपुरी चे सुपुत्र भारतीय सैन्यदल जवान रविकांत चिवळे 21 वर्ष सेवा करून जन्मभूमीत परतल्या बद्दल कंधार येथे जंगी स्वागत

कंधार ; प्रतिनिधी

मानसपुरी ता.कंधार येथिल सुपुत्र भारतीय सैन्यदल जवान रविकांत (नाना) चिवळे 21 वर्ष सेवा पूर्ण करून परत जन्मभूमीत परतल्या बद्दल कंधार येथे आज शुक्रवार दि.३ सप्टेंबर रोजी ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले.

येथिल बस स्थानका समोर शहरात प्रवेश होताच फटाक्याची अतिशबाजी करुन मित्रमंडळीने जंगी स्वागत केले.शहरातुन घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली.तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सत्कार करण्यात आला.माजी सैनिक बालाजी चुकलवाड,माजी सैनिक कंधार तालुकाध्यक्ष कांबळे,माजी सैनिक पोचिराम वाघमारे ,माजी सैनिक अजीज ,माजी सैनिक कल्याणकर,गंगाप्रसाद यन्नावार,सुरेश पाटील व गावकरी मित्रमंडळीने सत्काराचे नियोजन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *