कंधार तालुक्यातील पाताळगंगा येथिल शेतकरी गणेश मंडळाची कार्यकारणी जाहीर

कंधार (प्रतिनिधी)


कंधार , तालुक्यातील पाताळगंगा या गावी नुकतीच बैठक घेण्यात आली. सदर बैठकीस गावातील प्रतिष्टीत नागरिकांच्या उपस्थितीत शेतकरी व जेष्ठाच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये शेतकरी गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

यामध्ये शेतकरी गणेश मंडळाचे अध्यक्ष म्हणून नवनाथ आईतवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष गोविंद मुंडे,सचिव मारोती गंगनपाड,सहसचिव धोंडिबा मुंडे,कोषाध्यक्ष अरुण चिरले,कार्याध्यक्ष विठ्ठल चुकलवाड असून कार्यकारणीत सदस्य म्हणून व्यंकटी मुंडे,प्रकाश आईतवाड,नागनाथ गुंडाळे,अविनाश मुंडे,गजानन गंगनपाड,शिवाजी मुंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


शेतकरी गणेश मंडळातर्फे दहा दिवस विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे.तसेच शेतकरी गणेश मंडळांला उमरज संस्थांचे मठाधिपती महंत ह.भ.प.एकनाथ महाराज उमरजकर यांची भेट असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *