कंधार ;प्रतिनीधी
पृथ्वी तलावरील माणव जातीला आपल्या सुखी जिवनामध्ये ईश्वराची आठवण येत नाही जेव्हा माणवावर एखादे संकट येते जेव्हा तो दुःखी आसतो तेव्हा माञ ईश्वराची धावा करतो म्हणून ईश्वर हा फक्त दुःखाचा सोबती आहे असे प्रतिपादन मठाधीपती एकनाथ गुरु नामदेव महाराज यांनी सप्ताह सांगता कार्यक्रम काल्याचे किर्तना प्रसंगी भक्तांना मार्गदर्शन करताना म्हटले .
दिनांक ३१आँगष्ट रोजी मीनी (धाकटे )पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आसणारे श्री क्षेत्र उमरज येथे संस्थानचे पहीले मठाधीपती श्री संत नामदेव महाराज जन्मोत्सव सोहळा व श्री कृष्ण जन्मोत्सव सोहळा निमित्त महंत एकनाथ महाराज यांच्या पुढाकारातुन आयोजित सप्ताह कार्यक्रमाची सांगता मठाधीपति एकनाथ गुरु नामदेव महाराज यांच्या काल्याच्या किर्तना ने झाली या प्रसंगी भाविक भक्तांसी संवाद साधताना मठाधीपति एकनाथ महाराज पुढे आसे म्हणाले कि संसारातील प्रत्येक जिव हा दुखी आहे कारण संसाराच मुळच दुख रूप आहे जो अज्ञानी आहे त्याला दुख च पदरात येत असत हे दुख नाहिस करण्यासाठी संत संगती केली असता देवाची भेट संत करून घेतात एकदा का देवाची भेट झाली की मग त्या आनंदघन भगवंताच श्रीमुख पाहीले कि दुःख निवृत्ती होते व सुख प्राप्ती होते .आसे शेवटी बोलताना मठाधीपति म्हणाले .
या कार्यक्रमाला भा.ज.पा.तालुका अध्यक्ष भगवान राठोड ,भा.ज.पा.तालुका सरचिटणीस विनोद पाटिल तोरणे ,भा.ज.पा.शहर अध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार ,शे.का.प.चे जिल्हाअध्यक्ष योगेश पाटिल नंदनवनकर ,माजी सैनिक संघटना जिल्हाअध्यक्ष बालाजी चुकलवाड या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात साथ संगत गायक श्री हभप शंकर महाराज लोंढे दिलीप बुवा गंगण बीड दता म जनक रमेश बुचाले माऊली बंडेवाड मोतीराम मोहिते पपू लोले सदानंद गुरुजी सोपान चोंडे विनायक रायवाडीकर निळकंठ तोटवाट
मृदंग वाद क श्री विशाल म बाबुळ गाव नंदकुमार श्रीरामे श्रीकेदार सुगावे प्रमोद म चोंडीकर विठ्ठल कदम श्रषीकेश मुंडे यां भजनी मंडळी सह पंचक्रोशीतील हाजारो भाविक भक्तांची उपस्थिती होती.