कंधार ; प्रतिनिधी
सन २०१५-१६ व २०१६-१७ या कालावधीत भिषण पाणी टंचाई काळात बोगस बिले उचलणा-या सुमारे एकाहत्तर लक्ष रुपयांच्या बोगस बिलाची चौकशी करुन कार्यवाही करा अशी मागणी दि.३ सप्टेंबर रोजी पंचायत राज समिती दौरा प्रसंगी प्रमुख अनिल पाटील यांना सभापती घोरबांड व पं.स.सदस्य सत्यनारायण मानसपुरे यांचे निवेदन दिले.
२०१५-१६ व २०१६-१७ मध्ये कंधार तालुक्यातील भिषण पडला होता त्याकाळात टंचाई च्या काळात टँकर हे पेठवडज कुरुळा या परिसरात लावले होते गा परिसरातच बोर विहीर अधिग्रहन पण केलेल होते पण टँकरचा अंतर जास्तीचा दाखविण्यासाठी नांदेड येथुन टँकरला पाणी पुरवठा केला असल्याचे दाखवून कोटयावधी रुपयाचा घोटाळा करुन बोगस बिल काढण्यात आले आहेत. तसेच या बोगस बिलाची ऑडिटरने रिकव्हरी काढलेली आहे. व टंचाई काळात अॅडव्हास रक्कम उचल करण्याची परवानगी नसतानाही मोठ्या प्रमाणात अग्रीम रक्कम उचल करण्यात आली आहे. त्याची सुध्दा चौकशी करण्यात यावी.
कंधार तालुक्यातील पेठवडज, कुरुळा जिल्हा सर्कल मधील गावांना नांदेड येथुन टँकर पुरवठा करण्यासाठी अंदाजे १०० ते १२० किमी अंतर दाखवुन खोटे जिपीएस दाखवले आहेत त्याची चौकशी व्हावी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी / टेंकर गुत्तेदार यांची चौकशी करावी शासनाची फसवनुक करुन कोटयावधी रुपये हडप करणान्या या अधिकारी गुत्तेदारावर फौजदारी गुन्हे दाखल करुन तत्कालीन सहाय्यक लेखा अधिकारी यांची सहमती न घेता लेखा विभागतील कर्मचारी व अधिकारी यांनी अर्थिक हेतु लक्षात समोर ठेवून रुपये ७१३६९८४/- एकाहत्तर लक्ष छत्तीस हजार एकशे चान्याऐंशी रुपयेचे देयक काढण्यात आले.