दरेगावात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप.

अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. अजरामर अशा या साहित्याने उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. उपजत बुद्धिवादी म्हणून त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेता येतो. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रुजविण्याचे महत्त्वपूर्ण काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र यांच्यासह सीमा प्रदेशातील विविध भागांतील हजारो ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले. त्याच्यामुळे लोक प्रेरित झाले..

अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. अजरामर अशा या साहित्याने उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. उपजत बुद्धिवादी म्हणून त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेता येतो. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रुजविण्याचे महत्त्वपूर्ण काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र यांच्यासह सीमा प्रदेशातील विविध भागांतील हजारो ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले. त्याच्यामुळे लोक प्रेरित झाले..!

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मौजे. दरेगाव ता. नायगाव ( खै ) जिल्हा नांदेड येथे दिनांक: २९ ऑगस्ट २०२१ रोजी. स्व. जनसेवक बाबन खंडू दरेगावकर यांच्या संकल्पेतून युवा साहित्यिक सोनू बाबन दरेगावकर यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी. म्हणून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त असंख्य विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून जयंती साजरी करण्यात आली..!

  *महात्मा बसवेश्वर महाराज, संत रोहिदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, राजा भगीरथ, क्रांतिगुरू लहुजी साळवे, समाजसुधारक महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे, संत गाडगे महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ माँ. साहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महान महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन. सर्व गावकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले..!*

याप्रसंगी,

संभाजी पा. शिंदे ( सरपंच प्रतिनिधी दरेगाव ), मारोती पा. शिंदे ( वनविभाग अध्यक्ष दरेगाव ), प्रदिप पा. शिंदे ( माजी. सरपंच प्रतिनिधी दरेगाव ), गणेश गजेलवाड ( ग्रा. प. सदस्य दरेगाव ), मोहन बैलके ( ग्रा. प. सदस्य दरेगाव ), मारोती चिंतेवाड, हरी पा. शिंदे, संभाजी चिंतेवाड, नरहरी कानगुले, बाबुराव कानगुले, संग्राम रामशेटवाड, संभाजी घोणशेटवाड, नारायण बैलके, शंकर घोणशेटवाड, तुकाराम घोणशेटवाड, दत्ता बैलके, पंढरी घोणशेटवाड, उत्तम बैलके, राजेश घोणशेटवाड, केशव घोणशेटवाड, मारोती घोणशेटवाड, चंद्रकांत घोणशेटवाड, रामदास घोणशेटवाड, किशन बैलके, करण घोणशेटवाड, गणेश बैलके यांच्यासह महिला वर्ग व असंख्य बालविद्यार्थ्यांची रिमझिम पावसात सुध्दा उपस्थिती होती..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *