महात्मा फुले हायस्कूल नाईक नगर नांदेड येथे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती साजरी

नांदेड ; प्रतिनिधी

मराठवाडा महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ नावंदी द्वारा संचलित महात्मा फुले हायस्कूल नाईक नगर नांदेड येथे आज दिनांक ५ सप्टेंबर २०२१ रोजी आदर्श शिक्षक माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

तसेच शिक्षक दिनाच्या निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक श्री एन पी केंद्रे सर यांच्या हस्ते उपस्थित शिक्षकांना पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी शाळेतील जेष्ठ शिक्षक ए एस केंद्रे, आशिर्वाद गाडे, मनोज कुमार गुंटुरकर, विलास पाटील,नितीन रानमेवा, आरती अरूण केंद्रे, रामराव राठोड, विठ्ठल घुगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *