सैनिक फेडरेशनच्या जिल्हाध्यपदी निवड झाल्याबद्दल कंधार येथिल माजी सैनिक बालाजी चुकलवाड यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघच्यावतीने सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

सैनिक फेडरेशनच्या जिल्हाध्यपदी निवड झाल्याबद्दल कंधार येथिल माजी सैनिक बालाजी चुकलवाड यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कंधार च्यावतीने आज सोमवार दि.६ सप्टेंबर रोजी सत्कार करण्यात आला.

माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांच्या उत्कृष्ट,धाडसी , रोखठोक, निस्वार्थ कार्याची दखल घेऊन सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर तथा माजी खासदार माजी आमदार सुधीर सावंत यांनी बालाजी चुकलवाड यांना सैनिक फेडरेशनच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.

त्याबदल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कंधार शाखेच्या वतीने पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष मिर्झा जमीर बेग,दिगांबर वाघमारे , एस.पी.केंद्रे ,प्रा.भागवत गोरे,मंहमद सिंकदर यांच्या हस्ते बालाजी चुकलवाड यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी सैनिक संघटना तालुकाध्यक्ष कांबळे,पोचिराम वाघमारे,शेख अजीज ,कल्याणकर आदीसह माजी सैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *