नांदेड – येथील देगाव चाळ परिसरातील रमामाता महिला मंडळाची महत्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली. प्रज्ञा करूणा विहार येथे ६६ व्या धम्मचक्र परिवर्तन दिना निमित्त दिनांक १५ आॅक्टोबर रोजी अशोका विजया दशमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन यामधे ध्वजारोहण, ग्रंथ समारोप, अन्नदान,बुद्ध भीम गीते कार्यक्रमाचे आयोजन करावयाचे आहे. या निमित्त महिला मंडळाची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षा उपासिका भिमाबाई भुजंगराव हाटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली यामध्ये वरील कार्यक्रम सर्वानुमते ठरवण्यात आले.
बैठकीला उपस्थित महिला मंडळाच्या शोभाबाई गोडबोले, निर्मलाबाई पंडित, नना बाई निखाते, गिताबाई दिपके, सोनाबाई राजभोज, भागीरथाबाई थोरात, गंगाबाई सूर्यवंशी, पारूबाई हिंगोले, गयाबाई नरवाडे, चौत्राबाई चींतूरे, पंचशीला हटकर, निलाबाई हटकर, लक्ष्मीबाई खाडे, पद्मीनबाई गोडबोले, धम्माबाई नरवाडे, गिताबाई खाडे, आशाबाई हटकर, सुमनबाई वाघमारे, गूजाबाई खाडे, शिल्पा लोखंडे, सोनीताई खाडे, अंकिता गायकवाड, गोदावरीबाई लांडगे, पंचशीला उत्तम हटकर, लक्ष्मीबाई बाबूराव गोडबोले आयु डी एन कांबळे, नामदेव दिपके, राहुल कोकरे, सुभाष लोखंडे आदींची उपस्थिती होती. या बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ शिल्पा लोखंडे यांनी केले.