कंधार ; प्रतिनिधी
नांदेड जिल्हात सर्वत्र अतिवृष्टी होत आहे.काही ठिकाणचा गावातील नागरिकांचा संपर्क तुटत आहे लाईट नाही आश्या परिस्थितीत नागरिकांनी स्वतः व परिवाराची सुरक्षित घरीच राहावे व एक दोन दिवस हि परिस्थितीती राहाण्याची शक्यता हवामान खात्यानी दिलेचे सांगत आहेत.संपूर्ण नागरिकांनी सतर्क राहावे आसे अव्हान नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी केले आहे.
या वर्षीचा पावसाळा खूपच भीतीदायक वाटत आहे.इतका पाऊस येत आहे की थांबायचं नावच घेत नाही.गेली 2 दिवस झाले एकसारखा धो धो पाऊस पडतच आहे.काही गावातील घरच्या आजूबाजूने नाल्यासारखे पाणी वाहत आहे.
सगळे भित भित राहत आहेत आश्यावेळी बाहेर न निघणे व घरातच राहुन काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.लाईट नाही काही ठिकाणचे पावसामुळे विजेचे सगळे खांब पडले असावे किवा ओलेपणामुळें कंरट लागण्याचीही खुप भिती आसते.
गावातील नाल्यासारखे जे पाणी वाहत आहे त्या पाण्याने आता गल्लीत उग्र रूप धारण केलेले चित्र काही ठिकाणचे दिसत आहे.विशेषतः शेतकरी व नदिलगतच्या गावकर्याना स्वतः बरोबर आपल्या गुरा-जनावराची सुरक्षित ठिकाणी ठेवणे महत्त्वाचे आहे दोन तिन दिवस हे महत्त्वाचे आहे आसे अव्हान खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यानी केले आहे.