माळाकोळी ; एकनाथ तिडके
गऊळ तालुका कंधार येथील अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा प्रशासनाने हटवल्या प्रकरणी राज्यभरातून आंदोलन व निषेध व्यक्त केल्या जात असताना दि. सात सप्टेंबर रोजी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांच्या नेतृत्वाखाली अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा गऊळ येथे बसविण्यासाठी "विद्रोह आंदोलन" करत राज्यभरातील शेकडो कार्यकर्त्यांसह ताफा निघाला असताना माळाकोळी पोलिसांनी माळाकोळी येथे ताफा अडवून पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.
यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर घोषणा देत राष्ट्रीय महामार्गालगत काही काळ ठिय्या मांडला होता.
यावेळी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे, युवकचे प्रदेशाध्यक्ष सोहम लोंढे, बीड जिल्हाध्यक्ष सुभाष लोनके,सुनील पाटोळे सचिन कांबळे अमोल शेरकर अमोल वाघमारे लहू गायकवाड यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांना माळाकोळी पोलिसांनी ताब्यात घेतले होते,
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके, लोहा चे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यावेळी माळाकोळी पोलिसांनी मुंबई पोलीस अधिनियम 68, 69 अन्वये कार्यवाही करून आंदोलनकर्त्यांची सुटका केली.
यावेळी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ज्या अन्यायकारक प्रकारे अण्णाभाऊ साठे यांचा गऊळ येथील पुतळा हटवला गेला आहे , त्याच्या निषेधार्थ आम्ही डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने विद्रोह आंदोलन करत आहोत आज बीड येथून राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा घेऊन आम्ही गऊळ येथे बसवण्यासाठी जात होतो यावेळी माळाकोळी पोलिसांनी आम्हाला अडवून ताब्यात घेतले होते मात्र
जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी आमच्याशी संवाद साधून गऊळ येथील अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्याच्या संदर्भाने जिल्हाधिकारी स्तरावर बैठक होत असून योग्य कार्यवाही केली जाईल असे प्रशासनाने आश्वासन दिले आहे.त्यामुळे आम्ही आमचे आंदोलन थांबवत आहोत मात्र प्रशासनाने दिलेले आश्वासन पूर्ण करावे अशी मागणी त्यांनी केली.
बीड येथील डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी गऊळ येथे पुतळा बसवण्याच्या उद्देशाने निघाले असताना आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्ही माळाकोळी येथे त्यांना थांबवून मुंबई पोलीस अधिनियम 68, 69 अन्वये कार्यवाही केली आहे, इतर बाबतीत जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे व मा. जिल्हाधिकारी यांनी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे.
किशोर कांबळे उपविभागीय पोलिस अधिकारी