कंधार तालुका प्रतिनिधी
दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे कंधार तालुका सहीत महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने ढग फुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सोयाबीन मूग उडीद हळद यासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेला आहे तरी माननीय तहसीलदार साहेबांनी पंचनामे कागदी घोडे नाचवत सरसगड फॅक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी अन्यथा संभाजी ब्रिगेड कडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे या निवेदनामध्ये म्हटले आहे .
ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसगट 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी व ऑनलाइन प्रक्रिया न करता पिक विमा मंजूर करून शेतकऱ्याच्या खात्यावर त्वरित रक्कम जमा करण्यात यावे असे निवेदन तहसिलदार साहेब कंधार यांना मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले.
यावेळी उपस्थित मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष बळीराम पाटील पवार संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष राम पाटील आनकाडे संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष नितीन पाटील कोकाटे संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष विकास पाटील लूगांरे तालुका उपाध्यक्ष देवानंद पाटील मोरे संभाजी ब्रिगेड तालुका कार्याध्यक्ष धनंजय पाटील कौशल्य संभाजी ब्रिगेड तालुका कार्याध्यक्ष कृष्णा गोटामवाड संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष संतोष पाटील बोरोळे ज्ञानोबा पाटील गायकवाड वैजनाथ बोरोळे यांच्या सह तालुक्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.