कुंभार अशोक यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार जाहीर

पालम ; प्रतिनिधी


सेलू तालुक्यातील देऊळगाव गात येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अशोक रामराव कुंभार यांना ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशन चाळीसगाव च्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.


शिक्षक अशोक कुंभार यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याची दखल घेऊन संस्थेच्या वतीने सन 2021 22 सालच्या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.


शिक्षक म्हणून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल त्यांच्या या राज्यस्तरीय निवडीचे शाळेचे मुख्याध्यापक जाधव पी पी, शाळेतील सहकारी शिंदे सर, रोडगे सर, जगाडे सर, तलोकार सर, लहाने सर, ढगे सर , जाधव मॅडम, मगुटकर मॅडम ,सेलू प स चे गटशिक्षणाधिकारी गणराज येरमळ यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *